agriculture story in marathi, balanced feeding management in poultry | Agrowon

कोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती आवश्यक
डॉ. कल्याणी सरप, डॉ. एस. यु. नेमाडे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे, याचा निश्चित आरखडा तयार करावा, कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च फक्त खाद्यावर होतो. म्हणून पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याचे प्रमाण व त्या खाद्याची प्रत अतिशय महत्त्वाची असते. पक्ष्यांचे खाद्य भरडलेले बारीक असावे लागते.

पक्ष्यांना आहार देताना घ्यावयाची काळजी

पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे, याचा निश्चित आरखडा तयार करावा, कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च फक्त खाद्यावर होतो. म्हणून पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याचे प्रमाण व त्या खाद्याची प्रत अतिशय महत्त्वाची असते. पक्ष्यांचे खाद्य भरडलेले बारीक असावे लागते.

पक्ष्यांना आहार देताना घ्यावयाची काळजी

  • पक्ष्यांच्या खाद्यामध्ये सर्व महत्त्वाचे अन्नघटक उदा. प्रथिने, कार्बोदके, ऊर्जा, तंतू, क्षार, हे घटक त्यांच्या वाढीनुसार, ॠतुमानानुसार व उत्पादनानुसार मिळणे आवश्यक आहे .
  • पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामध्ये बुरशी, ई- कोलाय, मायकोप्लास्मा, साल्मोनेला नसल्याची खात्री करून घ्यावी.
  • खाद्य १ ते १.५ महिन्यापेक्षा जास्त वेळ साठवून ठेवू नये.
  • ॠतुमानानुसार खाद्यातील अन्नघटकाचे प्रमाण बदलावे.
  • पक्ष्यांच्या खाद्यामध्ये तंतूचे प्रमाण नेमून दिलेल्या प्रमाणातच असावे.
  • सर्व खाद्य घटकांचा आवश्यकतेनुसार वापर करून समतोल व पोषक खाद्य तयार करावे.
  • खाद्य भांड्यामध्ये भरताना एक तृतीयांश एवढेच भरावे जेणेकरून खाद्य वाया जाण्याचे प्रमाण कमी राहील.

कोंबड्यांच्या खाद्यामधील घटक
प्रथिने
पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते.

पिष्टमय पदार्थ (कर्बोदके)
सर्व प्रकारच्या एकदल धान्यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. या घटकांपासून पक्ष्यांना ग्लुकोज, साखर मिळते. शरीराच्या वाढीसाठी पिष्टमय आवश्यक असतात.

स्निग्ध पदार्थ
पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थ चरबीच्या स्वरूपात शरीराच्या वेगवेगळ्या भागांत साठून राहतात व अन्न तुटवड्याच्या काळात शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात.

खनिजे व क्षार
हाडांना बळकटी मिळण्यासाठी व अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते. आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायातील अशक्तपणा दूर होतो. शरीरास कॅल्शियम, लोह, मीठ, आयोडिन, तांबे, लोह, सोडियम, सेलेनियम, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते.

जीवनसत्त्वे
-जीवनसत्त्वामुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते व उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहते. जीवनसत्त्वाचे मिश्रण बाजारातून घेता येते. जीवनसत्त्वाचे दोन प्रकार पडतात.
पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे
बी -१, बी-२, बी-६ व बी-१२, बायोटिन, फोलिक व निकोटिनिक ॲसिड इत्यादी.
स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्त्वे  
अ, ड, ई आणि क
विरघळणारी जीवनसत्त्वे
पक्ष्यांच्या खाद्यामध्ये वापरण्यात येणारे खाद्यपदार्थ जसे की सोयाबीन, शेंगदाणा पेंड ई. मध्ये आफ्लाटोक्झिन यांसारख्या बुरशीची वाढ होण्याचा धोका असतो. त्यामुळे पक्ष्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पक्ष्यांना खाद्यातून विषाच्या शिरकावाला प्रतिबंध करणारी विरघळणारी जीवनसत्त्वे दिली जातात.

कॉक्सिडिओस्टस
गादी पद्धतीमध्ये वाढवलेल्या पक्ष्यांमध्ये कॉक्सिडिया नावाचे परोपजीवीची झपाट्याने वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे पक्ष्यांना रक्ती हगवण होते. हे टाळण्यासाठी खाद्यामध्ये कॉक्सिडिओस्टटसचा वापर करण्यात येतो.

अॅसिडिफायर्स
आम्ल सामू (अॅसिडिक पी.एच.) मध्ये जिवाणू व विषाणूंची वाढ होत नाही. पक्ष्यांच्या खाद्यामध्ये कमी तीव्रतेचे आम्ल पदार्थ जसे कि लॅक्टिक , सायट्रिक, अॅसिटिक अॅसिड यांसारख्या आम्लांचा उपयोग केला जातो. ही आम्ले खाद्यामध्ये मिसळल्यानंतर पचन संस्थेचा सामू आम्लधर्मीय होतो, त्यामुळे अनावश्यक व धोकादायक जिवाणू मरतात किंवा त्यांची वाढ होत नाही.

प्रोबायोटिक्स
पक्ष्यांच्या खाद्यामध्ये पचनास पूरक व बहुउपयोगी जिवाणूंची वाढ केलेल्या पदार्थांचा प्रोबायोटीक्स म्हणून वापर केला जातो. या प्रोबायोटिकमध्ये लॅक्टोबॅसिलस या जिवाणूंची वाढ केलेली असते.

संतुलित खाद्य निर्मिती
संतुलित खाद्य म्हणजे सर्व आवश्यक पौष्टिक तत्त्वांचा समावेश असलेले खाद्य, या खाद्यात वापरण्यात येणारे घटक यामध्ये असलेली प्रथिने, ऊर्जा व जास्तीत जास्त वापरण्याचे प्रमाण माहीत असणे आवश्यक आहे.

खाद्याची गुणवत्ता
ओलावा कमी असलेले व ताजे खाद्य असावे. खाद्याची गुणवत्ता व रासायनिक चाचणी प्रयोग शाळेत करता येते. एक किलो वजन वाढीसाठी ब्रॉयलर पक्ष्याला १.६ ते १.८ किलो खाद्य, तसेच लेयर पक्षी १.६ किलो खद्यातून एक डझन अंडी देत असेल, तर खाद्याची गुणवत्ता चांगली आहे, असे समजावे.

संपर्क ः डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५० ishasarap@gmail.com
(विषयविशेषज्ञ(पशुसंवर्धन), कृषीविज्ञानकेंद्र, यवतमाळ)

इतर कृषिपूरक
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...