agriculture story in marathi, banana crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

केळी पीकसल्ला
प्रा. एन. बी. शेख, ए. आर. मेढे, डॉ. आर. बी. सोनवणे
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

सद्यःस्थितीत वातावरणातील तापमानात हळूहळू घट होत आहे. थंडीमुळे मुळ्यांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो. थंडीचा काळात पाने निघण्याचा वेग मंदावतो. पानाची पुंगळी न उमलता करपते, झाडांची वाढ मंदावते आणि एकूण वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. निसवण्याचा कालावधी लांबल्यामुळे कालावधीसुद्धा लांबतो. केळीचे घड अडकण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.

सद्यःस्थितीत वातावरणातील तापमानात हळूहळू घट होत आहे. थंडीमुळे मुळ्यांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो. थंडीचा काळात पाने निघण्याचा वेग मंदावतो. पानाची पुंगळी न उमलता करपते, झाडांची वाढ मंदावते आणि एकूण वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. निसवण्याचा कालावधी लांबल्यामुळे कालावधीसुद्धा लांबतो. केळीचे घड अडकण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.

 • केळी लागवडीवेळी सजीव कुंपण लावले नसल्यास बागेभोवती ज्वारी किंवा बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा किंवा हिरवी शेडनेट लावावी.
 • मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळीने जमिनीलगत दर २-३ आठवड्यांनी कापावीत.
 • निंदणी, कुळवणी करून बागांमध्ये स्वच्छता ठेवावी.
 • मृग बागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा.
 • नियमितपणे ठिबक संचाची पाहणी करावी. गरज भासल्यास दुरुस्ती करावी.
 • बागेतील विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
 • पीक अवस्थेनुसार शिफारशीप्रमाणे पाणीपुरवठा करावा. शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
 • सर्व बागेतील ‘करपा’ रोगग्रस्त पाने किंवा पानाचा रोगग्रस्त भाग काढून, बागेबाहेर नेऊन नष्ट करावा.
 • तापमान १० अंश सेल्सिअसखाली गेल्यास भल्या पहाटे बागेत ओला काडीकचरा जाळून धूर करावा.
 • जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा पांढऱ्या पॉलिप्रोपिलीन कापडाच्या पिशवीने झाकावेत.

खत व्यवस्थापन :

 • मृग बागेस लागवडीनंतर १६५ दिवसांनी ८२ ग्रॅम युरिया, ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे.  २१० दिवसांनी प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया द्यावे.
 • नवीन कांदेबाग लागवडीस खताचा पहिला हप्ता प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया, ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत द्यावा. दुसरा हप्ता प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा.
 • ठिबक सिंचनातून खते देताना नवीन कांदे बागेस हजार झाडांसाठी लागवडीपासून १ ते १६ आठवडे ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. मृग बागेस १७ ते २८ आठवड्यांपर्यंत १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
 • निंबोळी ढेप प्रतिझाड २०० ग्रॅम (नवीन कांदे बागेस), तर मृग बागेस प्रति झाड ५०० ग्रॅम
 • द्यावी.

पीक संरक्षण :

 • नवीन कांदेबागेत इर्विनिया रॉट या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास ३०० ग्रॅम कॉपर ऑक्‍झी क्‍लोराइड + १५ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन + ३०० मिलि क्‍लोरपायरिफॉस प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करुन प्रतिझाड २०० मिलि या प्रमाणात आळवणी करावी.
 • करपा रोगनिर्मूलनासाठी प्रॉपिकोनॅझोल ५ मिलि अधिक १०० मिलि मिनरल ऑइल प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

संपर्क : प्रा. एन. बी. शेख, ०२५७ - २२५०९८६
(केळी संशोधन केंद्र, जळगाव)
टीप : * स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के.

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोगाईड
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
कोरफड लागवड स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
नेपिअर गवताची लागवडसं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
आठवड्याचे हवामान : राज्यात पूर्वमोसमी...महाराष्ट्रात हवामानात वेगाने होणारे बदल या...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
कृषी सल्ला : उन्हाळी मका, मका, डाळिंब,...मका पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी २०० लिटर...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहाखराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या...
जलसंधारणासाठी दगडी बंधारा, पाझर तलावदगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
दालचिनी, लवंग लागवडदालचिनी लागवड दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...