agriculture story in marathi, Blocking sunlight to cool Earth won't reduce crop damage from global warming | Agrowon

उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे सूर्यप्रकाश रोखण्याची कल्पना व्यहवार्य नाही
वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट एअरोसोल्स मिसळून, त्याद्वारे सूर्यप्रकाश रोखून जागतिक तापमानवाढीचे पिकांच्या वाढीवरील विपरीत परिणाम कमी करण्याची कल्पना तितकीशी व्यहवार्य ठरत नसल्याचे कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासात आढळले आहे. या दोन्ही बाबी एकमेकांचे चांगले परिणाम नष्ट करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोलोमॉन हसियांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्लोबल पॉलिसी लॅबोरेटरी येथे संचालक असून, जोनाथन प्रॉक्टर हे पी.एचडी संशोधक आहेत. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट एअरोसोल्स मिसळून, त्याद्वारे सूर्यप्रकाश रोखून जागतिक तापमानवाढीचे पिकांच्या वाढीवरील विपरीत परिणाम कमी करण्याची कल्पना तितकीशी व्यहवार्य ठरत नसल्याचे कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासात आढळले आहे. या दोन्ही बाबी एकमेकांचे चांगले परिणाम नष्ट करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोलोमॉन हसियांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्लोबल पॉलिसी लॅबोरेटरी येथे संचालक असून, जोनाथन प्रॉक्टर हे पी.एचडी संशोधक आहेत. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जागतिक तापमानामध्ये होत असलेल्या वाढीमुळे पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम संभवतात. हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी वातावरणामध्ये धुळीचे कण सोडून, त्यांच्या साह्याने तापमान कमी करणे शक्य असल्याचा दावा काही संशोधकांकडून होत होता. त्यासाठी ज्वालामुखी फुटण्याच्या वेळी वातावरणामध्ये पसरणाऱ्या कार्बन कणांमुळे परिसरातील तापमानामध्ये घट व पीक उत्पादनात वाढ होत असल्याचा संदर्भही दिला जातो. या काळात पिकांवरील उष्णतेचा ताण कमी असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचेही मत मांडले जाते. मात्र, वातावरणातील धुळीच्या कणामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळच्या एकूण परिस्थिती व माहिती साठ्याचे विश्‍लेषण कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील संशोधकांनी पीक उत्पादनाच्या अनुषंगाने केले आहे.
याबाबत माहिती देताना संशोधक जोनाथन प्रॉक्टर यांनी सांगितले, की पृथ्वीभोवती एअरोसोल्स पसरलेले असताना तापमानामध्ये घट होऊन पिकाच्या वाढीसाठी मदत होऊ शकते. मात्र, पिकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाचीही आवश्‍यकता असते. सूर्यप्रकाशाला अडवल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल. थोडक्यात, तापमान कमी झाल्याने होणाऱ्या फायद्याइतकाच प्रकाश संश्‍लेषणातील घटीमुळे नुकसानही संभवते. हे एखाद्या शल्यक्रियेमुळे उदभवणारे साइडइफेक्टस हे मूळ आजाराइतकेच असण्यासारखे आहे.

असे आहेत संशोधन

  • १९९१ मध्ये फिलिपिन्स येथील माऊंट पिनाट्यूबो येथील ज्वालामुखी उद्रेकादरम्यात तापमानामध्ये घट झाली होती. एकूण जागतिक पातळीवरील तापमानात आवश्‍यक तेवढी घट करण्यासाठी पृथ्वीच्या उच्चतम वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट एअरोसोल्स मिसळण्याची कल्पना काही संशोधकांनी मांडली होती. हे कण त्यावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित करतील. सध्या वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे ग्रीनहाउस इफेक्ट व तापमानवाढीची स्थिती दिसून येत आहे.
  • पिनाट्यूबो ज्वालामुखीच्या वेळी वातावरणामध्ये २० दशलक्ष टन सल्फर डायऑक्साईड मिसळला गेला होता. त्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये २.५ टक्क्याने घट झाली. सरासरी जागतिक तापमानामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने घट झाली होती.
  • संशोधकांच्या गटाने १९७९ ते २००९ या काळातील १०५ देशातील मका, सोयाबीन, भात आणि गहू उत्पादनाशी उपग्रहाद्वारे प्राप्त एअरोसोल्सच्या नेमक्या आकडेवारीची सांगड घातली. एअरोसोल्सचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम मिळवण्यात आला. त्याच वेळी जागतिक हवामानाच्या प्रारूपाद्वारे सल्फेट आधारित जिओइंजिनिअरींग प्रकल्पामुळे सूर्यप्रकाशामध्ये झालेली घटही मोजण्यात आली. त्याचा पिकाच्या उत्पादनावरील परिणामही मोजण्यात आला.
  • हे दोन्ही घटक एकमेकांचे चांगले परिणाम नष्ट करत असल्याचे दिसून आले.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...