Agriculture story in Marathi, bottle guard genome sequencing | Agrowon

भोपळा पिकाच्या जनुकीय विश्लेषणातून मिळेल नवी दृष्टी
वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

बॉयस थॉम्पसन इन्स्टिट्यूट (बीटीआय), अमेरिकी कृषी विभाग, चीन आणि फ्रान्स येथील संशोधकांच्या गटाने एकत्रितरीत्या भोपळा (Lagenaria siceraria) पिकाची जनुकीय संरचनेची सुसंगतवार मांडणी केली आहे. भविष्यासाठी खाद्य या प्रकल्पामध्ये भोपळा या पिकांवर संशोधन करण्यात येत असून, वेलवर्गीय पिकांसंदर्भात विविध अडचणींवर मात करण्यासाठी नवी दृष्टीच उपलब्ध होऊ शकते. यातून रोग प्रतिकारक आणि अधिक उत्पादनक्षम जातींच्या विकासाला चालना मिळणार आहे.

बॉयस थॉम्पसन इन्स्टिट्यूट (बीटीआय), अमेरिकी कृषी विभाग, चीन आणि फ्रान्स येथील संशोधकांच्या गटाने एकत्रितरीत्या भोपळा (Lagenaria siceraria) पिकाची जनुकीय संरचनेची सुसंगतवार मांडणी केली आहे. भविष्यासाठी खाद्य या प्रकल्पामध्ये भोपळा या पिकांवर संशोधन करण्यात येत असून, वेलवर्गीय पिकांसंदर्भात विविध अडचणींवर मात करण्यासाठी नवी दृष्टीच उपलब्ध होऊ शकते. यातून रोग प्रतिकारक आणि अधिक उत्पादनक्षम जातींच्या विकासाला चालना मिळणार आहे.

आहारामध्ये भोपळ्याचे विविध प्रकार जगभरामध्ये वापरले जातात. खाण्याप्रमाणेच औषधी गुणधर्म, वाद्यांच्या निर्मितीसह सुशोभीकरण असे त्यांचे अन्य उपयोग होतात. त्यामुळे या पिकापासून शेतकऱ्यांना उत्तम मूल्य मिळू शकते. या पिकाविषयी माहिती देताना बॉयस थॉम्पसन इन्स्टिट्यूट (बीटीआय) येथील सहायक प्रा. झांगजून फेई यांनी सांगितले, की वेलवर्गीय वनस्पतींमध्ये कलिंगड, खरबूज, भोपळे यांसारख्या पिकांचे जनुकीय विश्लेषण उपलब्ध आहे. त्यांच्या साह्याने अन्य वेलवर्गीय पिकांच्या जुनकीय विश्लेषणाला वेग आला आहे. या पिकांमध्ये उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर झालेले बदल आणि त्याचे उत्पादन किंवा गुणधर्मामध्ये झालेले बदल याविषयी अधिक सखोल माहिती उपलब्ध होणार आहे.

रोग आणि अतिथंडीला प्रतिबंधक किंवा सहनशील अशा विशिष्ट गुणधर्मांच्या जाती विकसनाला वेग मिळणार आहे. भोपळ्याच्या जनुकीय विश्लेषणामध्ये फळांचा उच्च दर्जा आणि अधिक रोग प्रतिकारकताविषयक मूलद्रव्यी मार्कर शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. या वेलवर्गीय पिकांमध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांसाठी संवेदनशील जनुकांचा शोध घेणेही शक्य होऊ शकते.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...