agriculture story in marathi. care and management of lactating cow | Agrowon

दुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापन
डॉ. मीनल प-हाड, प्रणिता सहाणे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

गाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात कमी होते. ही ऊर्जा भरून काढण्यासाठी गायीला संतुलित परिपूर्ण आहार देणे गरजेचे असते.
गाय व्यायल्यानंतर घ्यायची काळजी

गाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात कमी होते. ही ऊर्जा भरून काढण्यासाठी गायीला संतुलित परिपूर्ण आहार देणे गरजेचे असते.
गाय व्यायल्यानंतर घ्यायची काळजी

 • गाय व्यायल्यानंतर गायीला कोमट पाण्याने अंघोळ घालावी म्हणजे गाईला तर तरी येईल व तिच्या वेदना थोड्या कमी होतील.
 • ५ लीटर पाण्यामध्ये २ किलो गूळ मिसळून प्यायला द्यावे, मिश्रण बनवताना कोमट पाणीच वापरावे; कारण त्यामुळे गूळ शरीरामध्ये लगेच शोषला जाऊन गाईला त्वरित ऊर्जा मिळते.
 • गुळाच्या पाण्याने गाईला ऊर्जा व कॅल्शियम मिळते. जार (प्लासेंटा) पडण्यास मदत होते. हे मिश्रण २-३ दिवस गाईला प्यायला द्यावे.
 • बाजरी, मेथी, गूळ, खोबरे, हळीव व तेल यांची शिजवलेली खिचडी गाईला खायला द्यावी.
 • व्यायल्यावर एक आठवड्यानंतर गायीचे जंत निर्मूलन करून घ्यावे.
 • रोजच्या आहारातून कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्त्वयुक्त खाद्याचा समावेश करावा. म्हणजे गाईचे आरोग्य चांगले राहते व दूग्धोत्पादनात सातत्य राहते.
 • गाईला संतुलित आहारामध्ये २/३ हिरवा चारा व १/३ कोरडा चारा [२/३ कोंडा खाद्य व १/३ खुराक] द्यावा.
 • प्रत्येकी २.५ लिटर दुधासाठी १ किलो खुराक व संगोपनासाठी १ किलो खुराक देणे गरजेचे आहे.
 • रोजच्या खाद्यातून २ टक्के खनिज मिश्रण द्यावे.
 • स्वच्छ व मुबलक पाणी गाईला द्यावे.

दुधाळ गाईचे व्यवस्थापन

 • गोठ्यामधे दुधाळ गाईसाठी वेगळी व पुरेशी जागा असावी.
 • गोठ्यातील तळ/जमीन निसरडी नसावी. जमिनीचा उतार १.५ इंच असावा.
 • गव्हाणी चुन्याने रंगवावी, म्हणजे गोचीड व इतर किटक लगेच नजरेस दिसतात.
 • गोठ्यामध्ये व परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी, हवा खेळती असावी व पुरेसा सूर्यप्रकाश गोठ्यामध्ये असावा.
 • गोठा कोरडा असावा, ओलसरपणामुळे जनावरे आजारी पडू शकतात.
 • ठराविक दिवसानंतर गोठ्यामध्ये जंतुनाशक फवारणी करावी.
 • दुग्धव्यवसाय परवडण्यासाठी दोन वेतांमधील अंतर कमी असणे गरजेचे आहे. तसेच भाकडकाळ २ महिने असावा.
 • गाईच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लीचिंग पावडर टाकावी, तसेच पाण्याची तपासणी केलेली असावी.

स्वच्छ दूध उत्पादन

 • दूध काढण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था असावी व खोलीचा तळ स्वच्छ असावा.
 • दूध काढताना गाईना हळुवारपणे व काळजीने हाताळावे, पाठीवरून हात फिरवावा.
 • दूध काढण्यासाठी वेळ ठरवून त्यावेळीच दूध काढावे. दूध दिवसातून दोन वेळा काढावे. जास्त दूध देणाऱ्या‍या गाईचे दिवसातून तीन वेळा दूध काढावे.
 • दूध काढण्यासाठी वापरायची भांडी स्वच्छ असावीत.
 • कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा, तसेच त्यामधे पोटॅशिअम परमॅग्नेट चा वापर करावा.
 • दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ असावेत, हाताला जखमा नसाव्यात, नखे कापलेली असावीत, त्या व्यक्तीस त्वचेचा आजार नसावा व तो धूम्रपान करणारा नसावा.
 • सुरवातीचे दूध काढून टाकून द्यावे कारण त्यामधे जीवणूंचे प्रमाण जास्त असते. ५ ते ७ मिनिटांमधे सगळे दूध काढावे. कासेमधे दूध शिल्लक ठेवू नये त्यामुळे कासदाह होऊ शकतो.

संपर्क ः डॉ. मीनल प-हाड, ९०११२३१२२९
प्रणिता सहाणे, ८६००३०१३२९
(डॉ. प-हाड कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे येथे कार्यरत आहेत. तर, सहाणे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर येथे कार्यरत आहेत. ) 

इतर कृषिपूरक
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...