agriculture story in marathi, care and management of pregnent cow and new born calf | Agrowon

गाभण जनावरे, नवजात वासरांना जपा
डॉ. गिरीष यादव, डॉ. दिनेश लोखंडे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

गाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे आरोग्य व्यवस्थित राहते, सुदृढ, निरोगी वासरे जन्माला येतात. वासरांच्या व्यवस्थापनात वाढीच्या टप्प्यानुसार बदल केल्यामुळे गोठ्यातच दर्जेदार जनावरे तयार होतात.

गाभण गाईची काळजी

गाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे आरोग्य व्यवस्थित राहते, सुदृढ, निरोगी वासरे जन्माला येतात. वासरांच्या व्यवस्थापनात वाढीच्या टप्प्यानुसार बदल केल्यामुळे गोठ्यातच दर्जेदार जनावरे तयार होतात.

गाभण गाईची काळजी

 • साधारणतः गाईचा गर्भकाळ हा २८२ दिवसांचा असतो. गाईच्या अगोदर व्यालेल्या व कृत्रिम रेतन केलेल्या तारखांच्या नोंदी केलेल्या असाव्या व गाईची व्यायची अपेक्षित तारीख नोंद करून ठेवावी.
 • जेव्हा पशुपालकाकडे भरपूर जनावरे असतात. तेव्हा ती गोठ्यात बांधलेली असतात गोठ्यातील जमिनीचा पृष्ठभाग खडबडीत असावा, जेणेकरून गाई घसरून पडणार नाहीत. शक्यतो गाभण जनावरे इतर जनावरांपासून बाजूला बांधावीत.
 • गाभण काळ पूर्ण झालेली व्यायला आलेल्या जनावरात कास व निरण सुजणे इ. लक्षणे दिसतात अशी जनावरे वेगवेगळ्या गोठ्यात बांधावीत जेथे स्वच्छ हवा, भरपूर प्रकाश आणि जमीन स्वच्छ केलेली असावी.
 • सशक्त गाई आपोआप वितात, पण काही जनावरे अशक्त असल्यामुळे त्यांना विताना मदतीची आवश्यकता असते. पहिल्यांदा वासराने पाय निरनातून बाहेर येतात नंतर नाक दिसते व डोके बाहेर येते.
 • अनेक वेळा वासराची गर्भाशातील नैसर्गिक अवस्था (तोंड व पुढील पाय निरणाकडे) बदलते तेव्हा गाई अडतात व कळा देतात त्या वेळेस तत्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवावे.
 • गाई व्यायल्यानंतर गाईच्या निरणाचा बाहेरील भाग शेपटी व मागच्या पायाचे शेपटीच्या जवळील भाग पोटॅशिअम पेर्मेगनेटच्या कोमट पाण्याने किवा कडूलिंबाच्या पाला टाकून उकळलेल्या पाण्याने धुऊन घ्यावा.
 • गाय व्याल्यानंतर थंडीपासून बचाव करण्यासाठी तीला थोडावेळ उन्हात बांधावे व पिण्यास पाणी द्यावे.
 • गाय व्याल्यानंतर लगेचच धार काढावी व वासराला पाजावे.
 • गाईचा जार साधारणत: दोन ते चार तासात पडतो, हा जार जर बारा तासांपर्यंत पडला नाहीतर लगेचच पशुवैद्यकाच्या मदतीने जार काढावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा जार जर जनावरांनी खाला तर दुधाळ जनावरांत दूध कमी होते.
 • गाई व्यायल्यानंतर कासदाह व दुग्धज्वर हे सर्वसाधारण होणारे रोग आहेत त्या दृष्टीने पशुपालकांनी जागरूक असावे व वेळीच उपचार करून घ्यावेत.
 • व्यालेल्या गाईस भिजवलेला भुसा व थोडी पेंड द्यावी. पेंडीचे प्रमाण स्वतःच्या पालनपोषणसाठी प्रति दिवशी १ किलो किंवा प्रति २ लिटर दुधास ५०० ग्रॅमप्रमाणे खुराक द्यावा.

वासराची काळजी
वासरू जन्मल्यानंतर तत्काळ त्याच्या नाकातील व तोंडातील चिकट द्रव काढावा व श्वसन क्रिया सुरळीत होण्यासाठी त्याच्या छातीवर हाताने ८ ते १० वेळा दाबून सोडावे ज्यामुळे श्वसनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.

 • श्वसन चालू झाल्यास वासराला गाई समोर चाटण्यासाठी ठेवावे त्यामुळे वासराच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. गाई जर वासरास चाटत नसेल पोत्याने वासराच्या शरीरावर घासावे.
 • वासराची नाळ गरम पाण्याने धुऊन शरीरापासून २.५ सेमी अंतरावर कापावी व त्या ठिकाणी आयोडीन लावावे. जेणेकरून नाळेमध्ये जंतूचा प्रादुर्भाव होणार नाही.
 • जन्मल्यानंतर कमीत कमी एक तासात वासरास गाईचे पहिले दूध पाजावे. या दुधामुळे जन्मतः वासराच्या आतड्यात असलेली विष्ठा बाहेर टाकण्यास मदत होते व वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
 • गाईचे पहिले दूध वासरास त्याच्या वजनाच्या १/१० म्हणजे १० टक्के द्यावे. (२ ते २.५ लिटर रोज) व कमीत कमी पहिले पाच दिवस द्यावे. हे दूध दिल्याने वासराला हगवण लागत नाही.
 • व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या फार्मवर गाईचे दूध पाच दिवसांत द्यावे. व नंतर मिल्क रिप्लेसर चालू करावे.
 • वासरू १५ दिवसांचे झाल्यावर त्याला नंबर द्यावा. शिंगाचे डी होर्निंग करून घ्यावी व वासरू ३ महिन्यांचे झाल्यावर त्यास नंबर द्यावा. ॲन्थ्रॅक्स फऱ्या रोगाचे लसीकरण करावे.
 • लहान वासरे फुफ्फुसदाह आणि इतर परोपजीवी जंताच्या प्रादुभार्वाला बळी पडतात. वेळीच हे रोग होऊ नयेत म्हणून काळजी घेतली तर लहान वासरे दगावणार नाहीत व संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकेल.

संपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)

इतर कृषिपूरक
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...
प्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...
जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...
चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...
प्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...
नवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...
गायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...
सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...