योग्य वयात करा बोकडाचे खच्चीकरण

योग्य वयात करा बोकडाचे खच्चीकरण
योग्य वयात करा बोकडाचे खच्चीकरण

शेळीपालन व्यवसायात जे बोकड पैदाशीसाठी वापरायचे नाहीत त्यांचे योग्यवेळी खच्चीकरण करणे अावश्यक असते. त्यामुळे बोकडाचे वजन झपाट्याने वाढते अाणि बोकड मवाळ बनतात.

  • नवजात करडांपैकी जे बोकड शेळ्या भरवण्यासाठी उपयोगात अाणायचे नाहीत अशा सर्व बोकडांचे ४ ते ६ अाठवड्यात खच्चीकरण करावे.
  • खच्चीकरण प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच करावे.
  • खच्चीकरण केलेली जागा निर्जंतुक करावी.  
  • योग्य वाढीच्या बोकडांना बकरी ईदच्या वेळी पाच हजारांपासून लाखापर्यंत भाव मिळतो.
  • खच्चीकरणासाठी बर्डीझो कॅस्ट्रेटर (चिमटा पद्धत) नावाचे उपकरण वापरले जाते.
  • खच्चीकरण शक्यतो सकाळी लवकर स्वच्छ सूर्यप्रकाशात करावे.
  • पावसाळा अाणि थंडीच्या दिवसात खच्चीकरण करू नये कारण या काळात रोगराई व माशांचा वावर जास्त असतो.
  • खच्चीकरण केल्यानंतर बोकडाला लगेच धनुर्वाताचे टीटॅनसचे इंजेक्शन द्यावे.
  • चिमट्याने खच्चीकरण केल्यास बोकडाच्या अंडाशयाला जखम न करता अंडाशयाला रक्तपुरवठा करणारी व शुक्राणू वाहून नेणारी नस चिमटली जाते. त्यामुळे अंडाशय थोड्या दिवसांनी बारीक होते व बोकड पैदाशीच्या उपयोगाचा राहत नाही.
  • फायदे

  • बोकडाचे वजन झपाट्याने वाढते.
  • मांसाची प्रत सुधारते.
  • खच्चीकरण केल्यामुळे बोकड एकमेकांवर उडत नाहीत.
  • कातडीही चांगल्या प्रतीची तयार होऊन त्याला बाजारभाव चांगला मिळतो.
  • बकरी ईद सणाला अशा बोकडाला चांगली मागणी असते. नर व मादी करडांचे एकत्रित संगोपन करता येते.
  • प्रत्येक बोकडामागचा नफा वाढतो. बोकड शांत अाणि मवाळ बनते.
  • संपर्क ः डाॅ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com