स्वच्छता राखा, अन्नविषबाधा रोखा

विषबाधा टाळण्यासाठी पदार्थ बनवताना पुरेशी स्वच्छता बाळगणे अावश्यक अाहे.
विषबाधा टाळण्यासाठी पदार्थ बनवताना पुरेशी स्वच्छता बाळगणे अावश्यक अाहे.

जैव रासायनिक प्रक्रियेमुळे फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. या प्रक्रियेमध्ये अन्नपदार्थ सडणे, त्यास घाण वास येणे याचा समावेश होतो. असे अन्नपदार्थ सेवन केल्यास विषबाधा होऊ शकते.  

अन्नविषबाधेची कारणे जैविक घटकामुळे अन्नविषबाधा यामध्ये प्रामुख्याने बुरशी, जिवाणू, विषाणू इत्यादीचा समावेश होतो. एखादा सूक्ष्मजंतू पोटात गेल्यामुळे होऊ शकते. यामुळे होणारी विषबाधा सर्वांत हानिकारक असते. त्यामुळेच अन्न हाताळतेवेळी, साठवतेवेळी आणि शिजवतेवेळी निष्काळजीपणा केल्यास जिवाणूमुळे अन्न दूषित होते आणि विषबाधेचे प्रमाण वाढते, त्यामुळे स्वच्छता राखली पाहिजे.

जिवाणू आणि विषाणूमुळे अन्नविषबाधा बॅसिलस सिरस, क्‍लोस्ट्रोडीअम, इर्सेनिया यामुळे विषबाधा होते. त्यासाठी अन्न काळजीपूर्वक शिजवणे अावश्यक अाहे. अन्न हाताळताना हात स्वच्छ धुणे, भांडी, भाज्या, फळे स्वच्छ धुणे. अन्नपदार्थ, फळे अाणि भाज्यांची नियंत्रित तापमानावर साठवण करावी. वैयक्तिक स्वच्छता राखावी. विषाणू हे परोपजीवी असतात, त्यामुळे कावीळ सारखे रोग होतात.

कीटकनाशकांमुळे विषबाधा कीड अाणि रोग नियंत्रणासाठी पिकावर कीडनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे पिकावर कीडनाशकाचे अवशेष राहतात. त्यामुळेही अन्नपदार्थ विषारी बनतात.

भेसळयुक्त अन्नपदार्थ जास्त नफा मिळविण्यासाठी अन्नामध्ये भेसळ केली जाते. दुधात व दुग्धजन्य पदार्थांत मैद्याची, साखरेची, मिठाची, पाण्याची भेसळ केली जाते. तसेच हळद पावडर, मिरची पावडर, चहा पावडर यातसुद्धा भेसळ केली जाते. गव्हाच्या पिठात खडूची, तुपामध्ये वनस्पतीची तर मधामध्ये साखरेची भेसळ केली जाते.

प्रतिबंधात्मक उपाय  

  • अन्नधान्य उत्पादन, काढणी, वाहतूक, हाताळणी प्रक्रिया आणि साठवणूक या काळात स्वच्छतेच्या निकषाचे काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून सूक्ष्म जीवाणूंचा अन्नपदार्थांत शिरकाव होणार नाही.
  • भाज्या, फळे, काळी पडलेली ज्वारी इत्यादी काळजीपूर्वक स्वच्छ पाण्यात धुऊन वापरावीत. नासलेली व फार पिकलेली फळे आणि भाज्या विकत घेऊ नयेत.
  • अन्नदूषित करणारे रोगकारक सूक्ष्मजीव मनुष्याच्या हाताद्वारे अन्नपदार्थात जातात म्हणून अन्नपदार्थाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ साबण वापरून धुऊन घेणे आवश्‍यक असते. हाताची नखे कापून घ्यावीत. धान्य साठवते वेळी चांगले वाळवून, धुरीकरण केल्यानंतर साठवून ठेवावे.
  • डाळी आणि इतर अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून आहारात घ्यावे म्हणजे त्यामधील विषारी घटक आणि सूक्ष्म जंतूंचा नाश होईल.भेसळयुक्त पदार्थ टाळण्यासाठी बऱ्याच रासायनिक पद्धती आहेत. त्यांचा उपयोग करून भेसळ झालेला पदार्थ ओळखता येतो.
  • संपर्क : चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७ (सौ. के. एस. के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com