अंडी, मांस उत्पादनासाठी श्रीनिधी कोंबड्या

श्रीनिधी कोंबड्या
श्रीनिधी कोंबड्या

कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेने श्रीनिधी ही कोंबड्यांची जात परसातील कुक्कुटपालनासाठी विकसित केली आहे. मांस आणि अंडी अशा दुहेरी हेतूसाठी ही जात उपयोगी आहे. ग्रामीण अाणि अादिवासी क्षेत्रासाठी, परसातील कुक्कुटपालनासाठी ही जात उपयुक्त अाहे. या जातीच्या व्यवस्थापनातून चांगला नफा मिळू शकतो. वैशिष्ट्ये ः

  • अंडी देण्याची चांगली क्षमता अाणि चांगल्या वजनामुळे ही जात मांस व अंडी अशा दुहेरी हेतूसाठी उपयुक्त अाहे.
  • पिसे विविध रंगांची असतात.
  • अंडी तांबूस रंगाची व वजनाने अधिक असतात.
  • कोंबड्याचे ६ अाठवड्यांमध्ये सरासरी वजन ५०० ते ५५० ग्रॅम भरते.
  • ही जात १७० ते १७५ दिवसांत वयात येते.
  • वार्षिक सरासरी अंडी उत्पादन ः २२०- २३० अंडी अाहे.
  • प्रथम अंडी देण्याचे वय १६० दिवस असून ४० आठवड्यांपर्यंत ९० अंडी देतात.
  • प्रतिकारक्षमता चांगली असून प्रतिकूल हवामानातही तग धरून राहते.
  • संपर्क ः डॉ. अनिता काटेखाये, ७२१९२८८३५३ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com