agriculture story in marathi, control of disease and pests on chiku , Agrowon, Maharashtra | Agrowon

चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण
डाॅ. एस. बी. गंगावणे, ए. एस. ढाणे
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फांदीमर, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पाने व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

फांदीमर :
रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थिओब्रोमी
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते.

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फांदीमर, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पाने व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

फांदीमर :
रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थिओब्रोमी
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते.

नियंत्रण :  
रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
एक टक्के बोर्डी मिश्रणाची फवारणी करावी.

पानावरील करपा :
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानांवर तपकिरी चट्टे दिसून येतात. नंतर हे राखेच्या रंगासारखे होतात.  पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट येते.
नियंत्रण : फवारणी
बोर्डो मिश्रण - १ टक्का किंवा
कार्बेन्डॅझिम ( ५० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी .

पाने आणि कळ्या खाणारी अळी  :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) २ मि. लि. किंवा निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अॅझाडिरॅक्टीन (५०००० पीपीएम) - ०.५ मि.लि.
सूचना : अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा.

संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६
(कृषि संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर)

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...