Agriculture story in marathi, cottan peaking coat | Agrowon

कापूस, भाजीपाला तोडणी करताना वापरा वेचणी कोट
माधुरी रेवणवार
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

वेचणी कोट जाड कॉटनच्या कपड्याचा असल्यामुळे ऊन लागत नाही. कोटाच्या झोळीमध्ये सहा किलोपर्यंत कापूस मावतो. हा कोट भाजीपाला, फळे तोडतानादेखील वापरता येतो.
 

वेचणी कोट जाड कॉटनच्या कपड्याचा असल्यामुळे ऊन लागत नाही. कोटाच्या झोळीमध्ये सहा किलोपर्यंत कापूस मावतो. हा कोट भाजीपाला, फळे तोडतानादेखील वापरता येतो.
 
 कापूस वेचणीच्या काळात महिला ७ ते ८ तास शेतामध्येच असतात. कापूस वेचणी करताना महिला जुन्या साडीचा तुकडा किंवा कपडा कंबरेभोवती गुंडाळून ओटी तयार करतात किंवा आपल्या साडीच्या पदराच्या ओच्याचा उपयोग वेचलेला कापूस गोळा करण्यासाठी करतात. या कापूस वेचणी कार्यामध्ये साधारणत: दोन्ही हाताच्या हालचाली वारंवार होत असतात. ओटी भरली की शेताच्या बांधावर रिकामी करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात. ओटी सोडून रिकामी करून परत बांधावी लागते, यामध्ये बराचसा वेळ जातो.

 • कापूस वेचणी करताना कापसाची वाळलेली बोंडे बोटांना दुखापत करतात, शेतातून फिरताना कापसाच्या पऱ्हाट्यामुळे हाताच्या त्वचेवर ओरखडे उठतात.
 • जेव्हा कापूस जास्त प्रमाणात ओटीत भरला जातो, तेव्हा ओटी गुडघ्याच्या खाली येते आणि चालताना पायात अडकते. त्यामुळे वेचणी करताना त्रास होतो.
 • ओटीसह चालताना, ओटी पायावर व मांड्यावर सारखी आदळल्याने चालण्याची गती कमी होते. ओटी कंबरेला काचते व यामुळे त्वचेला खाज सुटते. उष्णतेमुळे डोके दुखणे, डोळ्यांची आग होणे, ऊन लागणे, पायाला गोळे येणे, कंबर दुखणे अशा महिलांच्या तक्रारी आहेत.
 • कापूस वेचणी करताना तो स्वच्छ असणे महत्त्वाचे असते. ओटीमधून कापूस जमिनीवर पडला की त्याबरोबर काडी, कचरा चिकटतो, त्यामुळे कापसाची प्रत खालावते.
 • काही भागात ओटी पाठीवर बांधली जाते. ओटी पाठीवर बांधल्यानंतर दोन्ही हातांनी कापूस वेचून हात वळवून शरीराच्या मागच्या बाजूला असलेल्या ओटीमध्ये कापूस गोळा केला जातो. यामुळे हातांच्या स्नायूंना पीळ बसतो. स्नायू अनैसर्गिक स्थितीमध्ये जातात. याचा परिणाम कामाच्या गतीवर होतो.

कापूस वेचणी कोट फायदेशीर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृह विज्ञान महाविद्यालयाच्या कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन या विभागातील डॉ. जयश्री झेंड आणि मंजूषा रेवणवार यांनी शेतकरी महिलांना कापूस वेचताना कोणताही त्रास होऊ नये आणि कापूसदेखील जास्त वेचता यावा या उद्देशाने कापूस वेचणी कोट तयार केला आहे.

 • हा कोट जाड कॉटनच्या कपड्याचा असल्यामुळे ऊन लागत नाही. घाम आला तर शोषला जातो.
 • लांब बाह्यांमुळे कापसाच्या बोंडाचे ओरखाडे त्वचेवर पडत नाहीत. पूर्ण शरीर झाकले जाते.
 • कापूस जमा करण्यासाठी झोळी मोठी असल्यामुळे त्यात ५ ते ६ किलो पर्यंत कापूस मावतो.
 • कापसाने भरलेल्या झोळीचे ओझे पोट, कमरेवर न पडता खांद्यावर पडते. यामुळे महिलांना त्रास कमी जाणवतो.
 • झोळीतून कापूस सहज बाहेर काढण्यासाठी झोळीच्या दोन्ही बाजूस बंद दिले आहेत ते बंद सोडले की, कापूस लवकर बाहेर काढून टाकता येतो.
 • हा कोट भाजीपाला, फळे तोडतानादेखील वापरता येतो.

संपर्क ः माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४
०२४६५-२२७७५७
कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड

 

इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठबोपी (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) गावातील...
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता...
शेतावरच करा गांडूळ खताची निर्मितीगांडूळ खत जमीन सुधारण्याच्या व पिकाच्या वाढीच्या...
तंत्र सायप्रिनस माशांच्या बीजोत्पादनाचेप्रजनन योग्य नर आणि मादीची निवड ...
खनिज पुरवठ्यामुळे वाढते प्रजननक्षमतासूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध...
अोळख कोकण कन्याळ शेळीची... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
म्हशींच्या चांगल्या अारोग्यासाठी...हवामान, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, चारा व पाण्याची...
अाहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा सूक्ष्म खनिजे शरीराला अतिशय कमी...
वाढवा दुधातील फॅटचे प्रमाणशासनाच्या नियमावलीनुसार गाईच्या आणि म्हशीच्या...
पशुसल्लासाधारणतः गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा २८२...
अळिंबी प्रथिनांतून पदार्थाच्या पोषकतेत...आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः...
अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसाइस्राईलमधील पशुपालनाची त्रिसूत्री म्हणजे गाईंचा...
अोळखा थंडीमुळे येणारा जनावरांतील ताणसध्या तापमानात घट होत अाहे व थंडीचे प्रमाण वाढत...
अंडी, मांस उत्पादनासाठी श्रीनिधी...कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेने...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींची...बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय...
जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य...वांझ जनावरांची जोपासना हे आर्थिकदृष्ट्या...
उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता फक्त ‘...आजपर्यंतच्या जीआय मानांकन या मालिकेत आपण भारत...
ओळखा लाळ्या खुरकुताचा प्रादुर्भावसद्यस्थितीत जनवारांना लाळ्या व खुरकुत हा आजार...