Agriculture story in marathi, crop wise organic fertilizer management | Agrowon

पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापन
प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 23 जानेवारी 2019

पशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता परवडण्याजोगा राहिला नाही. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत घरचे असले तरच वापरा. विकत घेऊन वापरू नका. ताग, धैंच्याचे हिरवळीचे खत नको. पीक घेतो तसे समांतर सेंद्रिय खत उत्पादन करायला शिका. ज्या जमिनीतील बिंदूसाठी सेंद्रिय खत वापरायचे आहे, तेथेच ते तयार करण्यास शिकले पाहिजे.

ऊस ः

पशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता परवडण्याजोगा राहिला नाही. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत घरचे असले तरच वापरा. विकत घेऊन वापरू नका. ताग, धैंच्याचे हिरवळीचे खत नको. पीक घेतो तसे समांतर सेंद्रिय खत उत्पादन करायला शिका. ज्या जमिनीतील बिंदूसाठी सेंद्रिय खत वापरायचे आहे, तेथेच ते तयार करण्यास शिकले पाहिजे.

ऊस ः

  • उसाच्या लागवडसाठी ४.५ ते ५ फुटांची सरी, प्रथम फक्त सरीच्या तळात तणनाशक मारून पिकाजवळील रान स्वच्छ ठेवणे. वरंब्यावर दोन-अडीच फुटांच्या पट्ट्यात तण वाढविणे, मोठे करणे, जून करून मारणे. तणातून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब तयार करता येतो.
  • येथे एक विचित्र अनुभवाची नोंद आहे. एका रानात सुरवातीचे दोन महिने दुर्लक्ष झाल्यामुळे तणांनी उसाची रोपे झाकून टाकली. पुढे ते सर्व तण जमिनीवर झोपविले (हाताने) व मारले. दोन महिन्यांचा कालावधी फुकट गेल्यामुळे उत्पादन घटण्याचा अंदाज. तण नियंत्रणानंतर उसाची जोमाने वाढ होऊन १० आरला १५ टन असे अनपेक्षित उत्पादन मिळाले. ही तणांची किमया!
  • ऊस लागवड खोडव्यानंतर पुढील फेरपालटाचे पीक बिना नांगरता ग्लायफोसेटने मारावे. पुढील पीक घ्यावे. अलीकडे ग्लायफोसेटला काहीशी प्रतिकारकता निर्माण झाल्याने खोडवे मेल्यासारखे दिसते व परत उगवते.
  • तणनाशकाचा वापर करावयाचा नसल्यास वरंब्यावर हलका रोटाव्हेटर मारावा. रिजरने परत सऱ्या पाडाव्यात. नांगरणी नको. खोडव्यांचा चुरा होईल. मुळांचे जाळे जमिनीत तसेच राहील. सेंद्रिय कर्बाचा प्रश्‍न समाप्त.

उसानंतर भात

  • वरीलप्रमाणे कोणत्याही मार्गाने खोडवे मारावेत. भात पेरणीची वेळ झाली की जमीन भिजवावी व वरंब्याच्या उतारावर टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकणीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. यावर उपाय सरीत एकसरीचे क्षेत्रफळ मोजून प्रतिहेक्‍टर बी वापरात २५ टक्के बी कमी करून दोन सरीला लागणारे बियाचे माप करावे व जाता-येता फोकावे. पॉवरटिलरला मध्ये मावतील तितके दात ठेवावेत. (वरंबा नांगरायचा नाही.) सरीच्या तळातील बी कोळप्याप्रमाणे हलक्‍या मशागतीने मातीत कालवावे. तीन फुटांच्या सरीत मध्ये वरंबा ठेवून टायर फिरवून सर रासणी करावी. वरंब्यावर भात नसले तरी सर्व रानात भात केल्याप्रमाणे उत्पादन मिळते. फक्त पेरणीपासून २५-३० दिवसांत सतत पाऊस लागल्यास पिकाला त्याचा त्रास होतो. अशी वेळ पाच-सात वर्षांतून एखादे वेळी येते.

भातानंतर भात

  • एसआरटी पद्धतीने एकदाच गादीवाफे करून त्यावर टोकण पद्धतीने भात पेरणे. पुढे याच कायमस्वरूपी गादीवाफ्यांवर शून्य मशागतीवर रब्बी, उन्हाळी पीक घेता येते. पुढील वर्षाचे भात मागील भात पिकाचे बुडखे व मुळांचे जाळे व खरीप रब्बीमधल्या काळात उगविणारे तण यातून सेंद्रिय कर्बाची गरज भागते. याच पद्धतीने नाचणी पीकही घेता येते.

फळबागांसाठी

  • पावसाळ्यात बागेत तणे वाढवावीत. पावसाळाअखेर तणनाशकाने मारावीत. बागेत वावर करावा लागत असेल तर वाटा तणनाशक मारून साफ ठेवाव्यात. शिल्लक बागेत तणे वाढवावीत. मोठी जून झाल्यावर औजाराने झोपवावीत. तणनाशकाने मारावीत. दुष्काळी साल असेल, पाणीटंचाई असेल तर तणे झोपवून हिरवे आच्छादन तसेच राखावे. बाग जिवंत राहील.

कोरडवाहू शेतीत सेंद्रिय खत व्यवस्थापन
ज्वारी 

  • खरीप पड रब्बीत पेरणी (शाळू दादर) खरिपात जमीन पड टाकावी. कुळवाच्या पाळ्या मारू नयेत. तणे वाढवावीत. पेरणी पूर्ण ४०-४५ दिवस तणनाशकाने तणे मारावीत. १०-१५ दिवसांनंतर चुकलेल्या तणासाठी तणनाशकाचा दुसरा फेर करावा. जमीन स्वच्छ होईल. शून्य मशागतीवर तिफणीने थेट पेरणी करावी. तणातून सेंद्रिय कर्ब, ज्वारीचा कडबा उपटून न घेता कापून घ्या. बुडखा व मुळाच्या जाळ्यातून सेंद्रिय कर्बाची गरज भागते. अवर्षण काळात बऱ्यापैकी, तर चांगल्या साली विक्रमी उत्पादन.

तूर-कापूस 

  • तूर-कापूस ही लांब अंतरावरील दीर्घ मुदतीची पिके. दोन ओळींतील अंतर १५० ते २८० सें.मी. योग्य ओलावा झाल्यावर फक्त काकर मारून शून्य मशागतीवर टोकण पद्धतीने पेरणी करावी. पिकाच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. निंदणी, कोळपणी अगर कापूस, तुरीसाठी शिफारशीप्रमाणे तणनाशक वापरून पट्टा स्वच्छ ठेवावा. दोन ओळींमध्ये ६० ते ९० सें.मी. तणांचा पट्टा वाढवावा. या दोन्ही पिकांत मूग, उडीद, सोयाबीनसारखे मिश्रपीक घेऊ नये. मिश्रपीक घेणे असल्यास फक्त हलकी वखराची पाळी मारून पेरणी यंत्राने पेरणी करावी. मिश्रपीक नको.
  • पावसाळाअखेर योग्य वेळी औजाराने तणे जमिनीवर झोपवावीत व तणनाशकाने मारावीत. जमिनीवरील भागावर आच्छादन होईल. जमिनीखाली तणाच्या मुळाचे दाट मुळाचे जाळे तयार होईल. या जाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणावर साठविले जाते. दोन पावसाच्या सत्रात मोठे अंतर पडल्यास पीक वाळणार नाही. पावसाळाअखेर पाऊस गेल्यानंतर ५०-६० दिवस पिकाची पाण्याची गरज भागेल. शेततळे मोटार ठिबक, संरक्षित पाणी कशाचीच गरज नाही. उत्पादनात वाढ. पुढील वर्षी तणाच्या पट्ट्यात पीक पिकाच्या पट्ट्यात तण शून्य मशागतीवर पिकाचे जमिनीखालील अवशेष तसेच ठेवावेत. यातून भरपूर सेंद्रिय खत फुकटात, जमिनी सुपीक. शाश्‍वत उत्पादनाची हमी. अवर्षण दुष्काळ साली कमीत कमी नुकसान.पशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता परवडण्याजोगा राहिला नाही. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत घरचे असले तरच वापरा. विकत घेऊन वापरू नका. ताग, धैंच्याच्या हिरवळीचे खत नको. पीक घेतो तसे समांतर सेंद्रिय खत उत्पादन करायला शिका. ज्या जमिनीत सेंद्रिय खत वापरायचे, तेथेच ते तयार करावे. बांधाच्या बाहेरून आणण्याची गरज नाही. या कामी तणासारखे उत्तम संसाधन नाही. मी तणनाशकाचा वापर सांगत असलो तरी तणनाशकाने जमीन भिजवू नका. तणे भिजवा. विघटन होत असता विषारी अंश संपून जातील. हा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा सिद्धांत आहे. ज्या शेतकऱ्याकडे मोठी जमीनधारणा आहे, त्यांनी दर तीन-चार वर्षांनी जमीन एक वर्ष पड टाकावी. आपल्या क्रयशक्तीइतकीच पिकाखाली घ्यावी. बाकी २५ ते ३० टक्के पड. जमीन पड टाकणे म्हणजे नुकसानी नाही. पुढील वर्षी सुपीकता वाढून जास्त उत्पादन मिळते. मर्यादित क्षेत्रावर काम करण्यात सुलभता. हे एक सेंद्रिय कर्ब वाढविण्याचेच तंत्र आहे. याला पर्यावरणीय पड (इको फॅलो तंत्र) असे नाव आहे. सेंद्रिय पदार्थाचे व्यवस्थापन हा कृषिविद्या शास्त्र शाखेचा विषय नसून भूसूक्ष्मजीवशास्त्राचा विषय आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषद याची नोंद घेईल का?

प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,
(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.) 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...