वेलदोडा लागवड कशी करावी?

वेलदोडा लागवड
वेलदोडा लागवड

वेलदोड्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त रेताड, जमीन चांगली असते. दलदलीच्या जागेमध्ये पीक नीट वाढत नाही, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब, तसेच बिया लावून करतात. झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावे. त्यांना एखादे-दुसरे मूळ, तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी. अलग केलेले नवीन जोमदार कोंब कायमच्या जागी लावण्यास योग्य असतात. नैसर्गिक सावली असलेल्या जागेत वेलदोड्याची रोपे लावावीत. लागवडीसाठी ६० X ६० X ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा टाकावा. त्यावर चांगले कुजलेले शेणखत आणि २०० ग्रॅम नीमपेंड व फॉस्फेटमिश्रित मातीने खड्डा भरून घ्यावा. खताच्या आणि मातीच्या मिश्रणाने खड्डा जमिनीच्या पातळीपेक्षा १५ सें.मी. उंच करून घ्यावा. नंतर या उंचवट्यावर पिशवीच्या आकाराचा खड्डा काढून रोपाची पिशवी ब्लेडच्या साह्याने कापून अलगद रोप लावावे. रोप जास्त खोल लावू नये. शक्‍यतो रोपे पावसाळ्यानंतर लावावीत. संपर्क ः ०२३५८- २८०२३८ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com