शेवगा लागवड कशी करावी?

शेवगा
शेवगा

शेवगा लागवडीसाठी डोंगर उताराच्या, हलक्‍या माळरानाची भरड जमीन चांगली असते. लागवडीसाठी कोकण रुचिरा, पी. के. एम.-१, पी. के. एम.-२ या जातींची निवड करावी. कोकण रुचिरा या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या, मध्यम लांब आणि शिजण्यास चांगल्या असतात. पी. के. एम. -१, पी. के. एम.-२ या जाती सहा ते आठ महिन्यांत फुलोऱ्यावर येतात.

दोन झाडांतील व दोन ओळींतील अंतर चार ते पाच मीटर ठेवावे. लागवड करताना ६० सेंमी × ६० सेंमी × ६० सेंमी आकाराचे खड्डे खणून शेणखत आणि मातीचे मिश्रण भरावे. लागवड जून-जुलैमध्ये करावी. संपर्क ः०२४५२- २२९००० कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com