मोहरी लागवडीबाबत माहिती द्यावी.
अखिल भारतीय समन्वयित मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मोहरी लागवडीसाठी  मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन नांगरून, वखरून तयार करावी. बागायती क्षेत्रामध्ये वखराने किंवा सारा यंत्राने सारे पाडावेत. पाणी व्यवस्थापन सुलभ होते. आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवड्यात पेरणी करावी. अति लवकर किंवा उशिरा परेणीमुळे उत्पादनावर परिणाम होतो. तेलाचे प्रमाण घटते. 

मोहरी लागवडीसाठी  मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन नांगरून, वखरून तयार करावी. बागायती क्षेत्रामध्ये वखराने किंवा सारा यंत्राने सारे पाडावेत. पाणी व्यवस्थापन सुलभ होते. आॅक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवड्यात पेरणी करावी. अति लवकर किंवा उशिरा परेणीमुळे उत्पादनावर परिणाम होतो. तेलाचे प्रमाण घटते. 

लागवडीसाठी पुसा बोल्ड, शताब्दी, जीएम-३, एनआरसीएचबी-१०१ या जातींची निवड करावी. प्रति हेक्टरी ५-६ किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास  ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे, उगवण चांगली होते. कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असताना ४५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी दाट होऊ नये, यासाठी मोहरीच्या आकाराची वाळू समप्रमाणात मिसळावी. बियाणे ३ ते ४ से.मी. खोल ओलीत पडेल, असे पेरावे. 

बागायती मोहरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वापसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत.गव्हाबरोबर आंतरपीक म्हणून ९ः१ किंवा ६ः१ ओळीमध्ये पेरणी फायदेशीर ठरते.

निश्चित ओलिताची सोय असल्यास, हेक्टरी ५० किलो नत्र व ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेली अर्धी नत्र मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. उत्पादन वाढीसाठी हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोराॅन पेरणीच्या वेळीच द्यावे.

संपर्क ः डाॅ. डी. डी. मानकर, ९४२१८१८११२, अखिल भारतीय समन्वयित मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर
 

इतर अॅग्रोगाईड
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
औषधी, चवदार कार्बी अँगलोंग आले जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे....
तंत्र कांदा साठवणुकीचे...जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते...
कोकम झाडाचे व्यवस्थापन कसे करावेकोकमच्या झाडाला जुन्या झालेल्या फांदीला फुले...
सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत...बनचिंचोली (जि. नांदेड) येथील बळवंतराव देवराव पऊळ...
बांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...
वांगी लागवड तंत्रज्ञान वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : ...
मिरची लागवड तंत्रज्ञान मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि...
कांदा पीक संरक्षण रोग नियंत्रण :  तपकिरी करपा :...
आवळा लागवडीविषयी माहिती द्यावी.आवळा लागवड सात x सात मीटर अंतरावर करावी. लागवड...
सुपारी लागवडीसाठी कोणती जात निवडावी?सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या...
वाघ्या घेवड्याचा झाला जीआयरूपी सन्मानभारतात कमी उत्पादनामुळे एकूण मागणीच्या ९० टक्के...
नेपिअर गवताची लागवड कशी करावी.संकरित नेपिअर या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
रब्बी हंगामात कोणत्या आंतरपीक पद्धतीचा...  अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील...
मोहरी लागवडीबाबत माहिती द्यावी.मोहरी लागवडीसाठी  मध्यम ते भारी, पाण्याचा...