जिरायती लागवडीसाठी योग्य जाती, लागवड पद्धत महत्त्वाची

हरभरा आणि करडई आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.
हरभरा आणि करडई आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.

रब्बी ज्वारी

  • मालदांडी - ३५-१, स्वाती, एसपीव्ही ८३९, एसपीव्ही ६५५, फुले यशोदा, परभणी मोती या जाती निवडाव्यात.
  • हेक्‍टरी १० किलो बियाणे पेरावे. प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
  • ४५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
  • ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी संपवावी.
  • हेक्‍टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद सुरवातीस जमिनीत पेरून द्यावे.
  • विरळणी पहिल्या २० दिवसांत संपवून दोन रोपातील अंतर १५-१७ सें.मी. ठेवावे.
  • पीक २० दिवसाचे झाल्यानंतर १२ दिवसाच्या अंतराने तीन कोळपण्या कराव्यात.
  • करडई

  • भीमा, शारदा, तारा, एन-६३-८, अनेगिरी, नारी-६, पीबीएनएस-१२ या जातींचा वापर करावा.
  • हेक्‍टरी १०-१२ किलो लागते. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.
  • ज्या जमिनीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे अशा जमिनीत करडईचे पीक घेऊ नये.
  • हेक्‍टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद पेरणी करताना सुरुवातीस जमिनीत खोल पेरून द्यावे.
  • पीक तीन आठवड्याचे झाल्यानंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात.
  • हरभरा

  • विजय, विशाल, विकास, बीडीएन ९-३, आयसीसीव्ही-२ या जाती पेराव्यात.
  • हेक्‍टरी ६०-६५ किलो बियाणे वापरावे.पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.
  • ओलावा पुरेसा असल्यास पेरणी ऑक्‍टोबर अखेरपर्यंत करावी.
  • हेक्‍टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद पेरतेवेळेस सुरवातीस जमिनीत खोल पेरून द्यावे.
  • पीक तीन आठवड्याचे झाल्यानंतर १० ते १५ दिवसांचे अंतराने ३ कोळपण्या कराव्यात.
  • पिकांच्या जातीप्रमाणे प्रतिहेक्‍टरी लागणारे बियाणे

    हरभरा

  • हरभरा पिकांच्या विविध जातीमध्ये दाण्याच्या मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. या आकारासोबतच त्यांचे हजार दाण्याचे वजन हे बदलत जाते. त्यामुळे हरभऱ्याच्या जाती आकाराप्रमाणे लहान, मध्यम व टपोरे मोठे या वर्गवारीप्रमाणे त्यांची प्रति हेक्‍टरी लागणाऱ्या बियाणांचे वजन बदलत जाते.
  • उशिरात उशिरा हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते, परंतु उशिरा पेरणी केल्यास थंडीचा कालावधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे
  • झाडांची वाढ जास्त होत नाही व उत्पादनात घट येते. ही घट कमी करण्यासाठी हरभऱ्यांच्या दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. वरून कमी करून २२.५ सें.मी. करून बियाणे सव्वापटीने (२५ टक्के जास्तीचे) वाढवून पेरणी करावी.
  • करडई

  • पेरणी शक्‍यतो वेळेवर करावी कारण करडईची लवकर पेरणी केल्यानंतर जर रोपअवस्थेत ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडल्यास पानांवर तपकिरी ठिपके पडून रोपे वाळतात/ मरतात. जर उशिरा पेरणी केली तर झाडाची पाने व खोड मऊ असल्यामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • करडई पिकांची सोटमूळ संस्था ही जमिनीमध्ये ४ ते ५ फूट खोलीपर्यंत वाढते. जमिनीच्या खालच्या थरातून पाणी व अन्नद्रव्यांचे पोषण होते. त्यामुळे जमिनीच्या प्रकाराचा करडई पिकांच्या झाडाच्या वाढीवर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
  • अतिभारी व सुपीक जमिनीमध्ये करडई पिकांच्या मुळ्यांना अधिक प्रमाणात पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होऊन पिकांची कायिक वाढ फार मोठ्या प्रमाणात होते (झाडाचा घेर मोठा होतो), त्यामुळे अतिभारी जमिनीमध्ये जास्त अंतरावर (६० सें.मी. ओळीतील अंतर व ३० सें.मी. दोन झाडामधील अंतर ठेवावे) पेरून करून विरळणी करावी.
  • प्रति हेक्‍टरी १२ ते १५ किलो (एकरी ५ ते ६ किलो) या प्रमाणात बियाणे वापरावे. पेरणीनंतर विरळणी करून दोन झाडांमधील अंतर जमिनीच्या प्रकाराप्रमाणे राखावे.
  • संपर्क ः डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com