agriculture story in marathi, custerd apple processing | Agrowon

सीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएस
मनीषा गायकवाड
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

सीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे. सीताफळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे शरीराला ताकद मिळते. सीताफळामध्ये व्हिटॅमिन बी-६ चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यास मदत होते. या फळामध्ये तांबे-लोह असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठीदेखील खूप लाभ आहे. सीताफळाचा अाहारात समावेश केल्यामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात. सीताफळापासून पुढील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

नेक्टर

सीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे. सीताफळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे शरीराला ताकद मिळते. सीताफळामध्ये व्हिटॅमिन बी-६ चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यास मदत होते. या फळामध्ये तांबे-लोह असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठीदेखील खूप लाभ आहे. सीताफळाचा अाहारात समावेश केल्यामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात. सीताफळापासून पुढील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

नेक्टर

  • नेक्टरमध्ये २० टक्के रस, १३ ते १५ टक्के टीएसएस आणि आम्लतेचे प्रमाण ०.३ टक्के असते.
  • एक लिटर गाळून घेतलेल्या रसामध्ये ३.३ लिटर पाणी, ६०० ग्रॅम साखर आणि १३ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून स्टीलच्या पातेल्यामध्ये मंद आचेवर शिजवावे.
  • मिश्रण विरघळेपर्यंत हलवत राहावे. चांगले ढवळून तयार नेक्टर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

स्क्वॅश

  • स्क्वॅशमध्ये २५ टक्के रस, ४० टक्के टीएसएस आणि आम्लतेचे प्रमाण १.५ टक्के असते.
  • एक लिटर गाळून घेतलेल्या रसामध्ये १ लिटर पाणी, १.८ किलो साखर, पोटॅशिअम मेटाबायसल्फेट ०.६ ग्रॅम आणि ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे.
  • मिश्रण विरघळेपर्यंत हलवत राहावे. चांगले ढवळून तयार स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

अारटीएस

  • अारटीएसमध्ये १० टक्के रस, १० टक्के टीएसएस आणि आम्लतेचे प्रमाण ०.३ टक्के असते.
  • एक लिटर गाळून घेतलेल्या रसामध्ये ७.७ लिटर पाणी, १.२ किलो साखर आणि २८ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे.
  • मिश्रण विरघळेपर्यंत हलवत राहावे. चांगले ढवळून तयार RTS निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

संपर्क ः मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७
(शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, नेहरुनगर, ता. कंधार, जि. नांदेड)

इतर कृषी प्रक्रिया
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य...विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना...
अंकुरित धान्यांपासून बेकरी उत्पादनेअंकुरलेल्या धान्यामध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात....
अन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...
प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...
कांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...