लक्षात घ्या आर्द्रता चक्र

लक्षात घ्या आर्द्रता चक्र
लक्षात घ्या आर्द्रता चक्र

उपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी वापरण्यास मिळते. ३० टक्के पाणी बाष्पीभवनाने हवेत जाते. येत्या काळात पाणीटंचाई लक्षात घेता जागतिक तापमान वाढीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.   जंगल परिसंस्थेच्या अभ्यासाअंतर्गत अनेक उपविषयांचा अभ्यास केला जातो. यामध्ये आर्द्रता चक्राचा समावेश आहे. पृथ्वीवरील उपलब्ध पाण्याचे वेगवेगळ्या जागेतील प्रमाण दिले आहे. ते अभ्यासण्यासारखे आहे. हे प्रमाण १०१७ किलो ग्रॅम या परिमाणात आहे.

  • एकूण पाणी : २,५०,०००
  • दोन्ही ध्रुवावरील बर्फ : २५५
  • भूगर्भातील पाणीसाठा : ७६.५
  • पृष्ठ भागावरील पाणी : २.०४
  • हवेत बाष्प रूपात : ०.१५
  • आर्द्रता चक्र हवा, जमीन व समुद्र यांमध्ये फिरत असते. या फिरण्याला सूर्याकडून ऊर्जा मिळते. यामध्ये जमिनीकडून हवेत बाष्पीभवन : ०.७१
  • हवेतून जमिनीकडे पाऊस : १.०८
  • समुद्राकडून हवेत बाष्पीभवन : ४.४९
  • हवेतून समुद्रात पाऊस : ४.१२
  • वरील माहितीवरून एकूण पाण्याच्या तुलनेत पृथ्वीवरील वनस्पती व प्राण्यासाठी किती पाणी सर्वसाधारण उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. दोन ध्रुवावरील पाणी जर पूर्णपणे विरघळून गेले तर त्या पाण्याचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर ५० मीटर (१६२ फूट) इतक्‍या उंचीने पृथ्वी झाकली जाईल. जागतिक तापमान वाढीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. याला कारण ध्रुवावरील थोडे जरी बर्फ विरघळले तरी समुद्राकाठची अनेक मोठी शहरे पाण्यासाठी जातील, असे सांगितले जाते, याची अंशतः प्रचिती लक्षात येते.

  • जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यापैकी ३५ टक्के पाणी समुद्रात जाते. या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर विरघळलेल्या
  • स्वरुपात अन्नद्रव्ये समुद्रात वाहून जातात. डोंगरावरील अगर चढावरील जमिनीवरून पाणी सखल भागात वाहून जाते. यामुळे या भागातील जमिनी हलक्‍या बनतात.
  • उपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी वापरण्यास मिळते. ३० टक्के पाणी बाष्पीभवनाने हवेत जाते. सर्वसाधारणपणे हवेतील सर्व पाणी पाऊस अगर द्रव रुपाने जमिनीवर पडले तर ते २.५ सें. मी.चा स्तंभाइतके होईल असे सांगितले जाते. जमिनीची पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापेक्षा जमिनीत ३८ पट जास्त पाण्याचा साठा होतो, जो वनस्पतीच्या मुळांना उपलब्ध नसतो अगर त्याचे बाष्पीभवन होत नाही. आता मोठ्या प्रमाणावर विहिरी, कूपनलिकांवाटे या पाण्याचा वापर शेती व औद्योगिक कारणासाठी केला जातो.
  • संपर्क : प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ ( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com