agriculture story in marathi, dairy products, milk processing, malegaon, vashim | Agrowon

ताजी दर्जेदार दुग्धोत्पादने हीच ढवळेश्वरची खासियत
गोपाल हागे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सध्या दूध उत्पादकांपुढे प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनातून नफा वाढवणे हाच मुख्य उपाय दिसतो आहे. मालेगाव (जि. वाशीम) येथील योगेश बळी यांनी आपल्या ढवळेश्वर दूध डेअरीच्या माध्यमातून हाच मार्ग निवडला. आपल्या दर्जेदार, ताज्या प्रक्रिया पदार्थांची बाजारपेठेत विशेष ओळख तयार केली. दररोज सुमारे सातशे ते एकहजार लिटर दूध संकलनाद्वारे परिसरातील अडीचशे शेतकऱ्यांनाही त्यातून शाश्‍वत उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. 

सध्या दूध उत्पादकांपुढे प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनातून नफा वाढवणे हाच मुख्य उपाय दिसतो आहे. मालेगाव (जि. वाशीम) येथील योगेश बळी यांनी आपल्या ढवळेश्वर दूध डेअरीच्या माध्यमातून हाच मार्ग निवडला. आपल्या दर्जेदार, ताज्या प्रक्रिया पदार्थांची बाजारपेठेत विशेष ओळख तयार केली. दररोज सुमारे सातशे ते एकहजार लिटर दूध संकलनाद्वारे परिसरातील अडीचशे शेतकऱ्यांनाही त्यातून शाश्‍वत उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. 

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव शहरात रामचंद्र बळी यांची दूध डेअरी ३० वर्षे अव्याहत सुरू अाहे. सन १९८६ मध्ये त्यांच्या पुढाकाराने ढवळेश्वर दूध उत्पादन सहकारी संस्था नावारुपाला अाली. त्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचे दूध संकलन करून शासकीय डेअरीला दिले जायचे. यासोबतच बळी यांनी स्वतःचा डेअरी व्यवसायही सुरू केला. शासकीय दूध खरेदी-विक्री धोरणात होणाऱ्या बदलांचा संकलनावर बऱ्याचदा परिणाम व्हायचा. अाता वाशीम जिल्ह्यात दूध खरेदीचा पेच बनला अाहे. अशा परिस्थितीत बळी यांच्या डेअरीने शेतकऱ्यांना मोठा अाधार दिला. 

वडिलांच्या पाठबळावर पुढची पिढी प्रक्रियेत 
आज बळी कुटूंबातील पुढची पिढी म्हणजे रामचंद्र यांचा मुलगा योगेश ‘ढवळेश्‍वर’ डेअरीची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मेहकर येथे एका संस्थेत सहा वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. रामचंद्र सहकारात सक्रिय असताना योगेश यांनी आता दुग्ध प्रक्रियेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. वडिलांनी दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. भांडवलासोबत सातत्याने पाठबळही पुरविले. अापले अनुभव, ज्ञान यांचेही धडे ते योगेश यांना देतात. 

योगेश यांचा व्यवसाय 

 • मालेगाव-मेहकर रोडवर 
 • संकलन केंद्रे- मेडशी, राजुरा, मालेगाव 
 • दूध संकलनासाठी डेअरीचे आपले वाहन 
 • सुमारे २५० दूध उत्पादक 
 • संकलन - १००० ते १२०० लिटर 
 • (उन्हाळ्यात सुमारे ७०० लिटर) 

शेतकऱ्यांना झालेले फायदे 

 • लगतच्या गावातच संकलन. त्यामुळे वाहतुकीचा भार कमी. 
 • शासकीय खरेदी सुरू-बंद असली तरी ढवळेश्वर डेअरी’ची खात्रीची बाजारपेठ 
 • तयार होणारे पदार्थ  
 • पेढा - ३५ ते ४० किलो 
 • पनीर - ३० ते ३५ किलो 
 • दही - ४० किलो 
 • खवा - ५ ते १० किलो 
 • तूप - २० ते २५ किलो 
 • श्रीखंड, आम्रखंड - मागणीनुसार 

पदार्थांची वैशिष्ट्ये 
पुरवठ्यात सातत्य
दर्जा
पदार्थांचा ताजेपणा 
प्रति महिना उलाढाल - १० ते १२ लाख रुपये 

रोजगार निर्मिती 

 • दूध संकलन, वाहतूक, उत्पादन आदी मिळून- १० ते १२ तरुणांना 
 • नोकरीपेक्षा व्यवसायात उतरून इतरांना नोकरी दिल्याचा अानंद योगेश यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतो. 

ठळक बाबी 

 • पेढा पंचक्रोशीत प्रसिद्ध. यंदा दिवाळीत चार दिवसांत सात क्विंटल विक्री 
 • दुधाला आधीच लौकिक मिळवला आहे. 
 • मालेगाव हे ठिकाण अौरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अनेकजण येथे थांबून आवर्जून पेढा खरेदी करतात. या ठिकाणावरून अांध्रप्रदेशातही वाहने जातात. त्याठिकाणचे ग्राहक जुळले आहेत. 
 • सहा रुपये प्रति फॅट प्रमाणे दुधाचा दर ठरविला जातो. दर दहाव्या दिवशी शेतकऱ्यांना मिळतात चुकारे. 
 • प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री आपल्याच पैशांतून खरेदी केली. त्यासाठी कोणते कर्ज काढावे लागले नाही. 
 • बळी कुटुंबाचा दिवस पहाटे पाच वाजताच सुरू होतो. रात्री १० वाजेपर्यंत रामचंद्र, योगेश व कर्मचारी सतत कार्यरत असतात. 

दूध ‘एटीएम’चा संकल्प 
येत्या काळात मालेगावमधील ग्राहकांना घरपोच दूध देण्याचा उपक्रम सुरू करणार असून ‘एटीएम’ दूध यंत्र, फिरते वाहन सुरू करण्याचा विचार असल्याचे योगेश यांनी सांगितले. दैनंदिन ग्राहकांची माहिती संकलन, चुकाऱ्याची पद्धत अशा विविध बाबींवर सध्या विचार सुरू अाहे. 

दर्जात तडजोड नाही 
यापूर्वीही केवळ दूध विक्री सुरू असताना त्याच्या दर्जात कोणतीही तडजोड केली नाही. तसेच प्रक्रिया पदार्थांच्या दर्जातही कुठली तडजोड ठेवली नसल्याचे योगेश अभिमानने सांगतात. गेली ३० वर्षे उत्कृष्ट दूध पुरवित असल्यानेच ग्राहकांचा विश्वास संपादन करता अाला. अाजवर विश्वासाला तडा जाऊ दिला नसल्याचे ते सांगतात. 

संपर्क- योगेश बळी - ७५८८५०२३७२ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...
हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...
संघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...
अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...
तंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शिक्षण, ग्रामविकासाला `श्रमजीवी'ची साथसातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही...
उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादनासह चॉकी...शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती...