कांदा निर्जलीकरणास आहे वाव

निर्जलीकरण केलेले कांद्याचे काप आणि कांदा पावडर
निर्जलीकरण केलेले कांद्याचे काप आणि कांदा पावडर

कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामांत पिकवले जाते. जागतिक भाजीपाला उत्पादनामध्ये कांदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण ६ टक्के आहे. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचे दर काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे. स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो. कांद्यामधील घटक मोतीबिंदू, मूत्राशय, मुळव्याध, रक्तस्राव, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील आजार यासाठी उपयुक्त आहेत. फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हॅक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे. कांद्याचे निर्जलीकरण

  • या प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण हावे यासाठी प्रक्रिया केली जाते.
  • निर्जलित कांदे हवाबंद कॅनमध्ये निर्यात केले जातात.
  • योग्य वेष्टन व साठवणूक तापमान असल्यास ६ ते १२ महिने हे कांदे टिकतात.
  • निर्जलित कांद्यांना युरोप बाजारपेठेत प्रमुख मागणी आहे.
  • निर्जलित कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.यासाठी मुख्यत्वे पांढरा कांदा वापरला जातो. उदा. बॉम्बे व्हाइट, पुसा व्हाइट. लाल कांद्याच्या प्रजातीमध्ये उदयपूर-१०१, पंजाब रेड इ.
  • ​कांद्याचे काप, पावडर, फ्लेक्स तयार करण्यासाठी फ्ल्यूडाईज्ड बेड ड्रायिंग पद्धत वापरली जाते. कांद्याचे १.५ मि. मी. जाडीच्या आकाराचे काप करून ४०, ५० आणि ६५ अंश सेल्सिअस तापमानाला ड्रायरमध्ये ठेवले जातात. या तापमानाला कांद्यातील आम्ल व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीवांपासून संरक्षित केले जाते.
  • कांदा निर्जलीकरणासाठी मायक्रोवेव्ह ही जलद, सोपी, कार्यक्षम पद्धत आहे. या पद्धतीमुळे ऊर्जेची बचत तर होतेच शिवाय कमी भांडवल लागते.
  • संपर्क ः बालाजी जाधव, ९४२००९०८९९) (अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com