Agriculture story in marathi, Dehydration of onion | Agrowon

कांदा निर्जलीकरणास आहे वाव
बालाजी जाधव, मयूरी तिपाले
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामांत पिकवले जाते. जागतिक भाजीपाला उत्पादनामध्ये कांदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण ६ टक्के आहे. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचे दर काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे. स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो.

कांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे खरीप व रब्बी हंगामांत पिकवले जाते. जागतिक भाजीपाला उत्पादनामध्ये कांदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे प्रमाण ६ टक्के आहे. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचे दर काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे. स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो. कांद्यामधील घटक मोतीबिंदू, मूत्राशय, मुळव्याध, रक्तस्राव, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील आजार यासाठी उपयुक्त आहेत. फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हॅक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे.

कांद्याचे निर्जलीकरण

  • या प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण हावे यासाठी प्रक्रिया केली जाते.
  • निर्जलित कांदे हवाबंद कॅनमध्ये निर्यात केले जातात.
  • योग्य वेष्टन व साठवणूक तापमान असल्यास ६ ते १२ महिने हे कांदे टिकतात.
  • निर्जलित कांद्यांना युरोप बाजारपेठेत प्रमुख मागणी आहे.
  • निर्जलित कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.यासाठी मुख्यत्वे पांढरा कांदा वापरला जातो. उदा. बॉम्बे व्हाइट, पुसा व्हाइट. लाल कांद्याच्या प्रजातीमध्ये उदयपूर-१०१, पंजाब रेड इ.
  • ​कांद्याचे काप, पावडर, फ्लेक्स तयार करण्यासाठी फ्ल्यूडाईज्ड बेड ड्रायिंग पद्धत वापरली जाते. कांद्याचे १.५ मि. मी. जाडीच्या आकाराचे काप करून ४०, ५० आणि ६५ अंश सेल्सिअस तापमानाला ड्रायरमध्ये ठेवले जातात. या तापमानाला कांद्यातील आम्ल व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीवांपासून संरक्षित केले जाते.
  • कांदा निर्जलीकरणासाठी मायक्रोवेव्ह ही जलद, सोपी, कार्यक्षम पद्धत आहे. या पद्धतीमुळे ऊर्जेची बचत तर होतेच शिवाय कमी भांडवल लागते.

संपर्क ः बालाजी जाधव, ९४२००९०८९९)
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड) 

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
अन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...
प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...
कांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थअंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक...
डाळिंबापासून अनारदाना, अनाररबडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
मोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...
कच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...
मार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...
आरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...
कवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...
पेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...
पेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....