भातावरील रोगांचे नियंत्रण

भातावरील रोगांचे नियंत्रण
भातावरील रोगांचे नियंत्रण

करपा ः

बुरशी ः पायरीक्‍युलॅरिया ओरायझो

  • पानाच्या रोगग्रस्त भागावर गोल लंबाकार अर्धपारदर्शक ठिपके दिसतात.
  • रोगाची तीव्रता वाढत जाईल त्याप्रमाणे ठिपक्‍यांचे प्रमाण वाढून पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात.
  • उपाययोजना ः

  • अतिरिक्त खतांचा वापर टाळावा.
  • शिफारशीनुसार खताचे नियोजन करावे.
  • जैविक नियंत्रण ः ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी      रासायनिक नियंत्रण ः कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड ३ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.

    आभासमय काजळी ः बुरशी ः युस्थेलॅजीनाईड व्हायरेनस

  • लोंबीतील काही फुलांमध्ये दाणे भरण्याऐवजी शेंदरी रंगाच्या गाठी दिसतात.
  • पुढे या गाठीचा रंग गर्द हिरवट मखमली होतो.
  • नियंत्रण ः

  • रोगग्रस्त झाडे किंवा रोगट लोंब्या काढून नष्ट कराव्यात.
  • क्‍लोरोथॅलोनील १ मि.लि.किंवा प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी.
  • उदबत्ता बुरशी ः इफिलीस ओरायझी

  • भात निसवल्यानंतर लोंबी न येता त्या ठिकाणी उदबत्तीसारखी कठीण राखी रंगाची दांडी दिसते. त्यामध्ये दाणे भरत नाहीत.
  • उपाय

  • रोगग्रस्त झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.
  • प्रोपिकोनॅझॉल १ मि.लि. प्रति लिटर पाणी.
  • जिवाणूजन्य करपा

  • सुरवातीला पानावर पिवळसर पांढरे अर्ध पारदर्शक ठिपके पडतात. ठिपक्‍यांची सुरवात पानाच्या टोकाकडून देठाकडे आणि एक किंवा दोन्ही कडांकडून आत अशी होते.
  • रोगाची पूर्ण वाढ झाल्यावर संपूर्ण पान करपते. आणि त्याचा राखाडी किंवा तांबूस तपकिरी होतो.
  • नत्र खताच्या वाजवीपेक्षा जास्त मात्रा दिल्यास आणि रोगास अतिबळी पडणाऱ्या भात जातीची लागवड केल्यास रोगाची वाढ झपाट्याने होते.
  • नियंत्रण

  • रोगबाधित झाडे जाळून किंवा खोल नांगरट करून नष्ट करावे.
  • स्ट्रेप्टोमायसीन* ०.०३ ग्रॅम व कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड ३ ग्रॅम प्रति प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी.
  • टुंग्रो

  • विषाणूजन्य रोग आहे. पानांवरील शिरांचा रंगसुद्धा पिवळसर होतो. रोगग्रस्त चुडे उशिरा फुलोऱ्यावर येतात आणि लोंब्या अर्धवट बाहेर पडतात.
  • लोंबीतील पळिंजांचे प्रमाण जास्त असते.
  • रोगाचा दुय्यम प्रसार तुडतुड्यामुळे होतो.
  • रोगबाधित झाडे आढळल्यास उपटून नष्ट करावीत.
  • तुडतुडे नियंत्रण ः क्‍लोरपायरिफॉस (२० टक्के) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी.
  • संपकर् ः  एस. आर. परदेशी, ९४२३५४४२०७ (प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com