Agriculture story in Marathi, detection of bacteria | Agrowon

खाद्य, पाण्यातील जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची पद्धत विकसित
वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

जगभरातील बहुतेक लोक भाज्या शिजवून खातात. परंतु अमेरिकेतील जास्तीत जास्त लोकांना फळे अाणि भाज्या कच्चे खाणे आवडते. खाद्यपदार्थ अाणि पाण्यातील जिवाणूंमुळे विविध प्रकारचे जिवाणूजन्य अाजार पसरतात. अन्नसुरक्षेतील सध्याची ही एक मोठी अाणि महत्त्वाची समस्या अाहे. ही समस्या लक्षात घेऊन अमेरिकेतील विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लिली हे यांनी मैसाचुसेट्स एमहर्स्ट विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांसह पाण्यामधील किंवा खाद्यातील जिवाणूंचा शोध घेण्यासाठी एक नवीन, जलद आणि कमी-खर्चाची पद्धत विकसित केली आहे.

जगभरातील बहुतेक लोक भाज्या शिजवून खातात. परंतु अमेरिकेतील जास्तीत जास्त लोकांना फळे अाणि भाज्या कच्चे खाणे आवडते. खाद्यपदार्थ अाणि पाण्यातील जिवाणूंमुळे विविध प्रकारचे जिवाणूजन्य अाजार पसरतात. अन्नसुरक्षेतील सध्याची ही एक मोठी अाणि महत्त्वाची समस्या अाहे. ही समस्या लक्षात घेऊन अमेरिकेतील विश्लेषणात्मक रसायनशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लिली हे यांनी मैसाचुसेट्स एमहर्स्ट विद्यापीठातील त्यांच्या सहकाऱ्यांसह पाण्यामधील किंवा खाद्यातील जिवाणूंचा शोध घेण्यासाठी एक नवीन, जलद आणि कमी-खर्चाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे पाणी, फळे अाणि भाज्यांतील जिवाणूंचा प्रादुर्भाव तपासून स्वच्छ अाणि अारोग्यदायी फळे अाणि भाज्यांची निवड करणे शक्य होणार अाहे. या पद्धतीमुळे जलदगतीने फळे अाणि भाज्यांतील जिवाणूंचा प्रादुर्भाव कळू शकेल.

...असा अोळखता येईल जिवाणूंचा प्रादुर्भाव

  • जिवाणूंचा शोध घेण्यासाठी एक चीप तयार करण्यात अाली अाहे. या चीपमध्ये प्रकाश सूक्ष्मदर्शकाचा वापर करण्यात अाला अाहे. त्यामुळे खाद्यपदार्थातील जिवाणू स्मार्ट फोनद्वारे सहजपणे डोळ्यांना दिसतील.
  • प्रकाश सूक्ष्मदर्शकासह वापरल्या जाणाऱ्या चिपमध्ये ३ - मरकॅप्टोफीनीलबोरोनिक अाम्लाचा वापर करण्यात अाला अाहे. त्यामुळे कोणतेही जिवाणू या चीपकडे आकर्षिले जाऊन बांधून ठेवले जातील.
  • पाणी, फळांचे ज्यूस किंवा भाज्यांची पाने बारीक करून त्यामध्ये ही चीप ठेवून स्मार्ट फोन ॲपद्वारे त्यातील जिवाणूचे प्रमाण तपासता येते.
  • या चीपकडे केवळ जिवाणू आकर्षिले जातात. साखर, प्रथिने, फॅट अाणि धूळ अाकर्षिली जात नाही.
  • चीपला लागलेले खाद्य किंवा पाणी जास्त सामू असलेल्या बफर द्रावणाने धुतले जाते. त्यामुळे केवळ जिवाणूचे प्रमाण स्मार्ट फोन सूक्ष्मदर्शक अाणि ॲपद्वारे डोळ्यांना दिसते.

जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची जलद पद्धत
जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्याची एरोबिक प्लेट काऊंट ही प्रमाणित पद्धत मानली जाते. परंतु या पद्धतीद्वारे जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखण्यासाठी दोन दिवस लागतात. तसेच काही जलद पद्धतीही अाहेत, परंतु त्या विश्‍वसनीय अाणि खात्रीशीर नाहीत, परंतु या पद्धतीमुळे दोन तासांच्या अात अधिक जलद अाणि खात्रीशीरपणे जिवाणूंचा प्रादुर्भाव अोळखता येणार अाहे. हे तंत्र आता पेटंटच्या प्रक्रियेत आहेत.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...