धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे नावीन्यपूर्ण तंत्र

वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी अल्ट्रा हर्मेटिक स्टोअरेज आणि धान्य साठवणीसाठी ककून्स
वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी अल्ट्रा हर्मेटिक स्टोअरेज आणि धान्य साठवणीसाठी ककून्स

अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे महिन्याभरात संपून जाते. अशा धान्यांच्या साठवणीसाठी तात्पुरत्या साठवणीच्या सोयींविषयी या लेखाममध्ये माहिती घेऊ. धान्यांची तात्पुरती साठवण ही काढणीनंतर वाहतुकीपर्यंतच्या काळासाठी आवश्यक असते. कायमस्वरुपी गोदामांच्या कमी उपलब्धतेमुळे भारतामध्ये अशा साठवण तंत्राचा वापर वर्षभरासाठीही शेतकरी करत असतात. अनेक शेतकऱ्यांना साठवणीची योग्य सुविधा नसल्यामुळे त्वरित शेतीमालाची विक्री करावी लागते. याकाळात बाजारात आवक वाढल्याने दर हमीभावापेक्षाही कमी असतात. त्याच धान्यांची केवळ ३ ते ४ महिने हंगामी साठवण केल्यास आणि त्याची बिगरहंगामी विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकते. धान्य साठवणीतील काळजी

  • साठवणीमध्ये ठेवले जाणाऱ्या धान्य कोरडे आणि थंड असावे.
  • प्रत्येक वेळी धान्य साठवणीत ठेवताना त्याचे तापमान ५ ते १० अंश असावे. यामुळे आर्द्रता त्यात शिरण्याचा धोका कमी होतो.
  • धान्याची आर्द्रता ही शिफारशीपेक्षा कधीही जास्त असू नये. सामान्यतः हे प्रमाण सोयाबीनसाठी १३ टक्के, ज्वारीसाठी १४ टक्के आणि मक्यासाठी १५.५ टक्के इतके असते. एकूण धान्यांची सरासरी आर्द्रता ही शिफारशीत आर्द्रतेपेक्षा अर्धा ते एक टक्क्याने कमी असावी.
  • कमी दर्जाच्या धान्यांची आर्द्रता ही चांगल्या दर्जाच्या धान्यापेक्षा एक टक्क्याने कमीच असावी.
  • तणयुक्त शेतातील किंवा वेगवेगळ्या वेळी पक्वता आलेली धान्ये तात्पुरत्या साठवणीमध्ये ठेवू नयेत. कारण तणांच्या बियाणी अपक्व धान्यामध्ये अधिक आर्द्रता असण्याची प्रवृत्ती असते. अशा धान्यांची थोडा हिस्साही संपूर्ण धान्य खराब करू शकतो.
  • साठवणीच्या संरचना धान्यसाठवण रिंगा ः तात्पुरत्या उच्च दर्जाच्या साठवणीसाठी कोरुगेटेड गॅल्व्हनाईज् पॅनेल्स हा स्वस्तातील पर्याय आहे. यात २२ एसडब्ल्यूजी जाडीचे कोरुगेशन ताकदवान आणि पुनर्वापरयोग्य साठवणीसाठी उपयुक्त ठरते. त्याला मजबुती देण्यासाठी दर थोड्या अंतरावर रिंगा टाकलेल्या असतात. या रिंगांना क्लिप्स असल्याने त्या ताणून बसवता येतात. काही वेळा रिंगाच्या वरील बाजूला औद्योगीक गॅसकेटही लावलेले असते, त्यामुळे त्याच्या कडा कोरुगेटेड भागांमध्ये घुसून नुकसान होण्याची शक्यता कमी होते. सहजतेने उभारता व हलवता येणाऱ्या तंबूसारखी गोदामे उत्तम दर्जाच्या कापडापासून तंबूप्रमाणे असलेली गोदामे प्रामुख्याने आपत्तीच्या काळामध्ये अन्नधान्यांच्या पुरवठ्यासाठी वापरली जातात. यात स्टिलच्या साह्याने एक संरचना तयार केलेली असून, त्यावर पीव्हिसी आवरणाचे पॉलिस्टर कापड ताणून बसवलेले असते. अशा संरचनांची क्षमता ५० टन ते ३ हजार टनापर्यंत असू शकते. यासाठी योग्य जागेची निवड अत्यंत महत्त्वाची असते, कारण पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था यात नसते. उंचावरील जिथे पाणी येणार नाही व थांबणार नाही, अशा जागा निवडाव्यात. तळासाठी कॉंक्रीटचा थर देऊन जमिनीतून पाण्याचा उमाळा येणार नाही, अशी पाणी प्रतिबंधक जागा तयार करून घ्यावी. तरीही पाणी येण्याची शक्यता असल्यास जाड प्लॅस्टिकचे शीट अंथरून सुरक्षित करून घ्यावे. ही गोदामे शक्यतो पांढऱ्या कापडाची असावीत, त्यामुळे उष्णता परावर्तित होऊन आतील तापमान थंड राहते. अधिक काळ साठवणीमध्ये आतमध्ये आर्द्रता निर्माण होऊन पाणी ठिपकण्याची शक्यता असते, यासाठी हवा खेळती राहण्याची व्यवस्था करावी. जर विजेची व्यवस्था असल्यास व्हेंटिलेशन फॅन्स लावावेत. ककून्स लवचिक अतिनिल प्रतिबंधक अशा पीव्हीसीच्या झीप लॉकयुक्त साठवण जागा असते. मोकळी असताना अत्यंत हलकी असून, सहजतेने एका जागेवरून दुसरीकडे नेता येते. त्याची उभारणी एक ते दोन मिनिटांमध्ये करता येते. याची क्षमता ५ ते ५० टनापर्यंत असू शकते. ही संरचना किटक, पाणी आणि बाष्पापासून धान्यांचे संरक्षण करत असल्याचा दावा उत्पादक करतात. अर्ध्या क्षमतेपर्यंत पोती भरून ठेवल्यानंतर पुन्हा त्यावर मोकळे धान्य भरता येते. हे दोन्ही भाग हवाबंद झीपच्या साह्याने बंद केलेली असतात. पूर्णतः हवाबंद असल्याने किटकांच्या प्रादुर्भावाचा धोका कमी राहतो. या पिशव्या क्रिसृ क्रॉसपद्धती असून, त्यात पाणी रोधक घटकांचा मधला थर असतो. त्यामुळे याच्या वरील भागामध्ये पावसाचे पाणी रोखले जाते. ताणून बांधल्यानंतर पाणी त्यावर थांबत नाही. योग्य प्रकारे उभारणी केल्यानंतर त्यात उंदीरही शिरू शकत नाहीत. एअर वेअरहाऊसेस हवेच्या दाबाने ही गोदामे फुगवणे शक्य असते. एकदा तयार केल्यानंतर त्यात पोत्यांच्या ने आण करणे सोपे जाते. याची क्षमता २००० ते ५००० टनापर्यंत असू शकते. यापेक्षा अधिक क्षमतेच्या गोदामामध्ये कन्व्हेअरच्या साह्याने धान्य ने आण करता येते. आतून सातत्याने सुरू असलेल्या हवेच्या प्रवाहामुळे बाष्प आणि आर्द्रता बाहेर फेकली जाते. या संरचनेमध्ये अतिनील किरणांना रोखणारी तत्त्वे असतात. मर्यादा ः एअर वेअरहाऊसेसमध्ये हवेचा दबाब कायम ठेवण्यासाठी सतत ऊर्जेची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे धान्यांची हलवाहलव अत्यंत कमी ठेवावी लागते. याचा देखभाल खर्च अधिक असतो. मोठ्या प्लॅस्टिक मेम्ब्रेन पिशव्या  ही पद्धत अन्य साठवण पर्यायाच्या तुलनेमध्ये अत्यंत स्वस्त आहे. कमी गुंतवणुकीमध्ये शेतावर धान्यांची साठवण शक्य होते. त्यामुळे काढणीनंतर त्वरित साठवणीसाठी उपयुक्त ठरतात. मर्यादा ः यामध्ये आर्द्रता शिरून धान्याचे नुकसान होऊ शकते. यामध्ये पंक्चर होऊ नये किंवा फाटू नये, यासाठी सातत्याने निरीक्षण आणि काळजी घ्यावी लागते. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी अल्ट्रा हर्मेटिक स्टोअरेज साधारण एक टन क्षमतेचे, सहज हलवता येणारे स्टोअरेज पर्याय वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी आवश्यक असतात. त्यात पिशव्यांमध्ये कोरड्या स्थितीत कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय किमान एक वर्षापर्यंत धान्य साठवता यावीत. हवा आणि अन्य घटक धान्यापासून दूर ठेवण्यासाठी हवाबंद आणि जल प्रतिरोधक वातावरण आत राहिले पाहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन पॉलिव्हिनाईल क्लोराईड घटकांपासून अल्ट्रा हर्मेटिक स्टोअरेज तयार केली जातात. त्यामध्ये धान्य साठवणे, भरणे किंवा वाहतूक करणे सोपे असते. यासाठी कोणत्याही बांधकामाची आवश्यकता नसून, सुमारे १० वर्षांपर्यंत टिकू शकते. हे वजनाने हलके असून, दोन माणसांच्या साह्याने तासापेक्षाही कमी वेळेत उभारू शकतात. प्लॅटफॉर्मवर उंदीररोधक (रोडेन्ट गार्ड) बसवल्यास उंदरापासून धान्याचा बचाव होतो. 

    (लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com