बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची सोपी पद्धत विकसित

बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची सोपी पद्धत विकसित
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची सोपी पद्धत विकसित

सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने बटाट्यातील शर्करेचे प्रमाण त्वरित जाणण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरगुती पातळीवरच आपल्या बटाट्यांतील शर्करा तपासणी शक्य होणार आहे. ही बाब प्रक्रिया उद्योगासाठी बटाटा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

सध्या चिप्स, फ्रेंच फ्राईजच्या चलतीमुळे प्रक्रिया उद्योगामध्ये बटाट्याला मोठी मागणी आहे. मात्र, प्रक्रियेसाठी ग्लुकोज (शर्करा)चे प्रमाण कमी असलेला बटाटा आवश्यक असतो. त्यामुळे अशा खास वाणांची निवड शेतकऱ्यांनी केल्यास मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र, सध्या प्रक्रिया केंद्रावर बटाटा स्वीकारण्यापूर्वी प्रत्यक्ष पदार्थ बनवून त्याची चाचणी घेतली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ असून, अचूकताही कमी आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने बटाट्यातील शर्करेचे प्रमाण त्वरित जाणण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यालाही घरगुती पातळीवर आपल्या बटाट्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. समस्या सर्वसामान्यपणे बटाट्याची साठवणूक शीतगृहात कमी तापमानावर (२-४ अंश सेल्सिअस) केली जाते. मात्र त्यामुळे बटाट्यात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. अशा बटाट्याचा प्रक्रियेसाठी वापर केल्यास तळण्याच्या क्रियेत उत्पादनांचा रंग काळा पडतो. त्यामुळे बटाट्यातील ग्लुकोजचे प्रमाण शोधून काढण्यासाठी प्रक्रिया केंद्रांकडून शेतकऱ्यांच्या बटाट्याची खरेदीपूर्व तपासणी केली जाते.  

पारंपरिक चिप्स रंग तपासणी पद्धत

  • शेतकऱ्याने आणलेल्या शेतीमालातून काही माल नमुना म्हणून काढून त्यापासून चिप्स बनविल्या जातात. तळताना त्यांचा रंग काळा पडल्यास संपूर्ण बटाटा नाकारला जातो. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे.
  • बटाट्यापासून उत्कृष्ट प्रतिच्या प्रक्रिया उत्पादनाच्या निर्मितीसाठी बटाट्यातील ग्लुकोजचे प्रमाण ०.१ टक्क्यापेक्षा कमी (१००० पीपीएम) असणे आवश्‍यक असते.
  • डीपस्टिक पद्धत

  • शिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने बटाट्यातील ग्लुकोजचे प्रमाण तपासण्यासाठी पट्ट्या (डीपस्टिक) बनविल्या आहेत.
  • बटाट्याला काप घेऊन त्यात या पट्ट्या केवळ ५ मिनिटे जरी घालून ठेवल्या तरी जेवढा भाग बटाट्यात घातलेला असेल त्याच्यावर बटाट्यातील ग्लुकोजची क्रिया होऊन विशिष्ट रंग येतो.
  • रंगानुसार बटाट्यात ग्लुकोजचे प्रमाण किती आहे हे सांगणारी मापक पट्टी सोबत दिलेली आहे. त्यावरून बटाट्यातील ग्लुकोजचे नेमके प्रमाण समजते.
  • ऐच्छिक पद्धतीने घेतलेल्या २ ते ५ बटाट्यांवर चाकूने निम्म्या खोलीपर्यंत काप घेतात. या कापलेल्या भागात डीपस्टिक ५-१० सेकंदांसाठी घालून ठेवतात. तेवढ्या काळात स्टिककडून बटाट्यातील रस पुरेशा प्रमाणात शोषला जातो.  
  • त्यानंतर डीपस्टिक बटाट्यातून बाहेर काढून ५ मिनिटे तशीच ठेवली जाते. या काळात बटाट्यातील रसाची डीपस्टिकवरील रसायनाशी (जेथपर्यंत ती बटाट्यात बुडविली आहे तेथपर्यंत) रासायनिक क्रिया होऊन तिचा रंग बदलतो.
  • सोबत दिलेल्या रंगतपासणी तक्त्यावरील रंगाशी जुळवून पाहिल्यास ग्लुकोजचे नेमके प्रमाण काढता येते.
  • ‘डीपस्टिकची वैशिष्ट्ये

  • अत्यंत संवेदनशील ः बटाट्यामध्ये अगदी कमी म्हणजे ५० पीपीएम एवढे जरी ग्लुकोजचे प्रमाण असेल तरीही ते शोधून काढू शकतात. बटाट्यातील ग्लुकोजचे प्रमाण १००० पीपीएमपेक्षा कमी असल्याचे दिसून आले तर असा बटाटा प्रक्रियेसाठी योग्य मानला जातो.
  • हाताळण्यास सोपी ः ही पद्धत अगदी सोपी असून, अशिक्षित शेतकरीही सहज वापरू शकतो.
  • केवळ ५ मिनिटांत ग्लुकोज तपासणी होते.      
  • डीपस्टिक दोन वर्षांपर्यंत टिकून राहतात.
  • बटाट्याच्या सर्व जाती, साठवण्याच्या सर्व पद्धती आणि कंदाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेतील ग्लुकोज तपासणीसाठी उपयुक्त.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com