Agriculture story in marathi, disease management in green gram crop | Agrowon

ओळखा हरभऱ्यावरील रोगाचा प्रादुर्भाव
डॉ. धनश्री सरनोबत, लीना शितोळे
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

हरभरा वाढीच्या टप्प्यामध्ये मर, मानकुजव्या आणि बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या रोगाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

मर रोग ः
रोगकारक बुरशी ः फ्युजेरिअम ऑक्‍सिस्पोरम फॉर्मा
लक्षणे ः

 • कोवळी रोपे कोमेजतात. जमिनीलगत खोडावरील पेशी रंगहीन होत जातात.
 • खोडाच्या मध्यपेशी तपकिरी किंवा काळ्या पडलेल्या दिसतात.
 • पानांचे देठ व फुलांचे गुच्छ मरगळून मोठी झाडे कोमेजतात.

नियंत्रण ः

हरभरा वाढीच्या टप्प्यामध्ये मर, मानकुजव्या आणि बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या रोगाची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

मर रोग ः
रोगकारक बुरशी ः फ्युजेरिअम ऑक्‍सिस्पोरम फॉर्मा
लक्षणे ः

 • कोवळी रोपे कोमेजतात. जमिनीलगत खोडावरील पेशी रंगहीन होत जातात.
 • खोडाच्या मध्यपेशी तपकिरी किंवा काळ्या पडलेल्या दिसतात.
 • पानांचे देठ व फुलांचे गुच्छ मरगळून मोठी झाडे कोमेजतात.

नियंत्रण ः

 • लागवडीसाठी विशाल, दिग्विजय या रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
 • प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन वर्षापर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये.

मान कुजव्या ः
रोगकारक बुरशी ः स्क्‍लेरोशियम रोल्फसी
लक्षणे ः

 • रोपे पिवळी पडून मरतात, वाळतात.
 • जमिनीलगतचा भाग बारीक होऊन कुजू लागतो. प्रादुर्भाव झालेल्या भागावर पांढरे पट्टे येतात.

नियंत्रण ः

 • कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया
 • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी

 
ओली काळी मूळ कूज ः

रोगकारक बुरशी ः फ्युजॅरियम सोलॅनी
लक्षणे ः

 • अति ओलावा असलेल्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
 • मुळांना जोडलेल्या खोडाच्या वरील भागावर तपकिरी रंगाचे डाग दिसतात.
 • मुळे काळी पडून सडतात.

नियंत्रण ः

 • विशाल, विराट या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
 • पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी.

खुजा रोग ः
विषाणू-मुळे या रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे ः

 • झाडांची वाढ खुंटते, पाने छोटी होऊन पिवळी तपकिरी होतात.
 • सुदृढ झाडाच्या पानापेक्षा प्रादुर्भावीत पाने कडक असतात.
 • खोडातील तंतुपेशी तपकिरी पडतात.

नियंत्रण ः

 • पीकेव्ही-१, पीकेव्ही-४  रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
 • रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड ०.०८ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बुरशीजन्य करपा ः

रोगकारक बुरशी ः अस्कोकायटा रेबी
अति आर्द्रता व कमी तापमान या रोगास पोषक आहे. सर्वसाधारणपणे फुलोरा व घाटे धरणाऱ्या वेळी या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो.
लक्षणे ः

 • खोडाच्या खालच्या बाजूस गडद तपकिरी ठिपके दिसू लागतात.
 • रोपे कोलमडून पडतात. पानावरील ठिपके गोलाकार, कडा तपकिरी व केंद्रक करड्या रंगाचे असतात.

नियंत्रण ः

 • विजय या रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी.
 • थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी.
 • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क ः डॉ. धनश्री सरनोबत, ८२७५४७३२०२
(वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...