अाजारापासून वाचवा निरोगी जनावरांना

गाय
गाय

जनावरांमध्ये विविध प्रकारचे जिवाणूजन्य, विषाणूजन्य अाणि संसर्गजन्य अाजार अाढळतात. हे अाजार विविध माध्यमांतून निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान भेटल्यास असे विषाणू विविध अवयवांत प्रादुर्भाव करतात. अशा अाजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास अाजारी जनावरे लक्षात येऊन होणारे अार्थिक नुकसान टाळता येईल.

१. तोंडखुरी व पायखुरी

प्रसार रोगग्रस्त जनावराशी प्रत्यक्ष संसर्ग किंवा रोगी जनावराने दूषित केलेले खाद्य, चारा व पाणी जखमातील स्रवातून प्रसार

प्रमुख लक्षणे

  • सुरवातीला खूप ताप येणे, मुखदाह, लाळ गळणे, खाणेपिणे मंदावणे, जिभेस चट्टे पडणे, तोंडात व पायाच्या खुरात जखमा होतात व त्यामुळे जनावर लंगडतात.
  • उत्पादनात घट होते. काही जनावरांमध्ये कासेवरही फोड येतात.
  • उपचार व प्रतिबंधात्मक उपाय

  • आजारी जनावरांच्या जखमा पोटॅशियम किंवा तुरटीच्या पाण्याने दिवसातून तीनदा स्वच्छ कराव्यात.
  • योग्य प्रतिजैविकचा पशुवैद्यकच्या सल्ल्याने उपयोग करावा. दरवर्षी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • २. आंत्रविषार

    प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी इ.

  • एकाच वेळी अनेक जनावरे एकाएकी आजारी पडणे व अचानक मृत्युमुखी पडणे, खाणेपिणे बंद होणे, अस्थिरपणे हालचाल करणे, अतिशय पातळ हागवण व जुलाब होणे.
  • उपचार व प्रतिबंधक उपाय प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

    ३. फऱ्या

    प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी किंवा जखमाद्वारे जीवाणूचा शरीरात प्रवेश होतो.

  • एकाएकी ताप येतो. मागचा पाय लंगडतो, मांसल भागाला सुज येते, दाबले असता चरचर असा आवाज होतो.
  • सुजलेल्या भागातून घाण पडते व त्यास घाण वास येतो. लागण झाल्यापासून तीन दिवसांत उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते.
  • उपचार व प्रतिबंधात्मक उपाय आजारी जनावरांना ४-६ दिवसांपर्यंत योग्य प्रतिजैविकाचा वापर करून वाचविता येते. दरवर्षी ऍलम प्रेसीपीटेट लस टोचून घ्यावी.

    ४. पेस्टे डेस पेटीट्‌स रुमानायटीस (पीपीआर) या आजाराला प्लेग असही म्हणतात. प्रमुख लक्षणे एकाएकी ताप येतो, अतिसार, उलट्या होणे, खोकला, सतत नाक वाहने, गर्भपात, दृष्टिपटलाची अपारदर्शकता, धापा टाकणे, जीभ, ओठाचा आतील भाग व वरील जबड्यातील मांसल भागांत पंढरत पदार्थ साचणे.

    उपचार व प्रतिबंधक उपाय आजारी जनावरांना ३-७ दिवसांपर्यंत योग्य प्रतिजैविकांचा किंवा जीवनसत्त्वाचा वापर करावा. दरवर्षी प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.

    ५.  घटसर्प

    प्रसार दूषित व सांसर्गिक खाद्य, चारा व पाणी, रोगी जनावरांचा प्रत्यक्ष संसर्ग इ.

  • जनावर एकाएकी आजारी पडणे, खाणेपिणे बंद होणे, जोराचा ताप येऊन गळ्याला सूज येते. व ती पुढे पायापर्यंत उतरते.
  • घशाची घरघर सुरू होते. जीभ व घसा सुजतो. श्‍वासोच्छ्‌वासास त्रास होतो.
  • नाकातून पाणी वाहते व वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावते.
  • त्वरित उपचार केले तर रोग बरा होऊ शकतो.  
  • औषधे व इतर प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घ्यावीत. अतिशित वारे, थंड हवा व पाऊस यामुळे जनावरांवर ताण येतो.
  • रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने जनावरे आजारी पडण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.
  • आजारी जनावर कळपाबाहेर काढून वेळीच उपचार करावे. जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी.
  • संपर्क : डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५ (डॉ. वारके नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर डॉ. बोबडे वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com