agriculture story in marathi, diseases of reproductive system of cows and buffaloses | Agrowon

वेळीच ओळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजार
डॉ. शुभांगी वारके, डॉ. सुमेधा बोबडे
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

जनावरांच्या संगोपनामध्ये उच्च फलनक्षमता किंवा प्रजनन ही एक महत्त्वाची बाब असून ती टिकवण्यासाठी जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. प्रजननासंबंधी आजार जनावर उत्तम प्रकारचे असूनही उत्पादनावर अनिष्ट परिणाम करतात.

प्रजननाशी संबंधीत आजारामध्ये बृसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस, ट्रायकोमोनियासिस, लेप्टोस्पायरोसिस या रोगाचा समावेश होतो. या अाजारावर लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता, कृत्रिम रेतन इ. उपाययोजना प्रभावी ठरतात.

बृसेल्लोसिस

जनावरांच्या संगोपनामध्ये उच्च फलनक्षमता किंवा प्रजनन ही एक महत्त्वाची बाब असून ती टिकवण्यासाठी जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. प्रजननासंबंधी आजार जनावर उत्तम प्रकारचे असूनही उत्पादनावर अनिष्ट परिणाम करतात.

प्रजननाशी संबंधीत आजारामध्ये बृसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस, ट्रायकोमोनियासिस, लेप्टोस्पायरोसिस या रोगाचा समावेश होतो. या अाजारावर लसीकरण, गोठ्यातील स्वच्छता, कृत्रिम रेतन इ. उपाययोजना प्रभावी ठरतात.

बृसेल्लोसिस

 • हा आजार जनावरांमध्ये गर्भपात व वंधत्वास (तात्पुरते किंवा कायमस्वरूपी) करणीभूत ठरतो, याला सांसर्गिक गर्भपात असेही म्हणतात.
 • हा आजार बृसेल्ला अबोरटस या जीवाणूमुळे होतो. बृसेल्लोसिसचा प्रादुर्भाव झालेली जनावरे नेहमीच गर्भपातास कारणीभूत ठरतात असे नाही, तर अशक्त वासरांना/करडाना जन्म देणे, वार अडकणे याचे प्रमाण या आजारात जास्त असते.
 • दूषित अन्न किंवा पाणी, गर्भाशयातील स्त्रावातून या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे
गाभण जनावरात सात ते नऊ महिन्यांच्या दरम्यान गर्भपात होणे, वार अडकणे, गर्भाशयाचा दाह, कासेचा दाह, वेतातील अंतर वाढते, जनावरांचे दूध कमी होते.

उपाय

 • रोगग्रस्त जनावरे इतर जनावरांपासून त्वरित वेगळी करावीत.
 • कळपातील जनावरांचे बृसेल्ला रोगनिदान करून घ्यावे.
 • गर्भाशयातील स्त्राव, वार व वारेचा स्त्राव, रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे.
 • या रोगासाठी ४-८ महिन्यांच्या वासरांमध्ये रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.
 • कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा.
 • या रोगाची लागण झालेली जनावरे, वासरांचे शव, जार, गर्भस्त्राव यांची गावाबाहेर योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून निरोगी जनावरात हा आजार बळावणार नाही.

२) व्हिब्रिओसिस

 • -हा आजार विब्रिओ फिटस या जीवणूमुळे होतो.

लक्षणे

 • गरोदरपणात किंवा गर्भावस्थेमध्ये गर्भपात होणे. पुनरावृत्ती प्रजनन, जनावर अनियमितपणे माजवर येणे, ढगाळ किंवा मलिन पूमिश्रित स्त्राव स्त्रवणे.

उपाय

 • कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा. रोगप्रतिबंधात्मक जिवाणूरोधकांचा, प्रतिजैविकांचा वापर करावा.

३) ट्रायकोमोनियासीस

 • हा गर्भाशयाचा संसर्गजन्य आजार असून ट्रायकोमोनास फिटस या आदिजीवामुळे होतो.
 • रोगजंतू फक्त पुनरुत्पादन संस्थेतील अवयवामध्ये राहतात, त्यामुळे हंगामी वांझपना येतो, गर्भाशयाला सूज येते, योनिमार्गातून पूमिश्रित द्राव स्त्रवतो, त्यामुळे गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा वासरू बाहेर पडत नाही.

उपाय

 • खात्रीशीर उपाय नाही, परंतु जनावराला नंतर ९० दिवस विश्रांती द्यावी.
 • गोठ्याची स्वच्छता ठेवावी.

४) संसर्गजन्य श्वासननलिकेचा दाह (इन्फेक्षीयस बोवाईन रायनोट्रकियायटीस )

 • हा आजार विषाणूमुळे बळावतो.

लक्षणे

 • ताप येणे, अनुनासिक/ नाक स्त्रवणे, नेत्रश्लेष्माचा दाह, श्वासनसंबंधी फुफूसदाह, गर्भपात अशी लक्षणे दिसून येतात.

उपाय

 • प्रतिजैविकांचा तसेच तापविरोधी औषधांचा वापर करावा.

प्रजनन व्यवस्थापन

 • जनावरांना क्षार खनिजे, व जीवनसत्वाचा पुरवठा करावा म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल, जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
 • माजावर न येण्याऱ्या‍ जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करावी व आवश्यक तो उपचार करून घ्यावा.
 • प्रसूतीच्या काळात जनावरांचा गोठा अणि जनावरे स्वच्छ ठेवावीत.
 • वर्षातून एकदा कळपातील सर्व जनावरांच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी व लागण झालेली जनावरे वेगळी करावीत.
 • रोगाचा प्रादुर्भाव झालेली जनावरे, गर्भपात झालेल्या जनावरांचे शव, वार किंवा गर्भस्त्राव यांची पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्यरीत्या विल्हेवाट लावावी.
 • योग्य औषधोपचार, लसीकरण, लसीकरणाच्या पूर्वी जनावरांना जंताचे औषध पाजून घ्यावे.

संपर्क ः डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५
(नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

इतर कृषिपूरक
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...
प्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...
जनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...
चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...
प्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...
नवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...
गायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...
सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...