agriculture story in marathi, export quality grapes farming, lakhewadi, indapur, pune | Agrowon

पंचेचाळीस एकरांत द्राक्षाचे आदर्श, निर्यातक्षम व्यवस्थापन
अमोल कुटे
शुक्रवार, 1 मार्च 2019

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील अवर्षणग्रस्त लाखेवाडी येथील श्रीमंत ढोले यांनी सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करून ४५ एकरांत निर्यातक्षम द्राक्षबाग फुलवली आहे. आपल्या ११० एकरांतील शेतीतून दीडशे जणांच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध केला आहे. पशुपालनाची जोड देत गोबरगॅस निर्मिती साधत 
स्लरी, शेणखत वापरातून रासायनिक खतांच्या वापरात बचत साधली आहे. 

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील अवर्षणग्रस्त लाखेवाडी येथील श्रीमंत ढोले यांनी सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करून ४५ एकरांत निर्यातक्षम द्राक्षबाग फुलवली आहे. आपल्या ११० एकरांतील शेतीतून दीडशे जणांच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध केला आहे. पशुपालनाची जोड देत गोबरगॅस निर्मिती साधत 
स्लरी, शेणखत वापरातून रासायनिक खतांच्या वापरात बचत साधली आहे. 

पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील सुमारे २२ दुष्काळी गावांंपैकी एक असलेल्या लाखेवाडी गावात पारंपरिक पद्धतीने बाजरी, ज्वारी, मका, भाजीपाल्यासह रब्बी पिके घेतली जायची. सन १९९७- ९८ च्या काळात वीर धरण आणि खडकवासला धरणांच्या कालव्यातून या भागात पाणी आले. शेतकऱ्यांनी शेतीकडे कल वाढविला. पाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा पिकांची लागवड वाढल्याने परिसर दुग्धोत्पादनातही अग्रेसर झालेला. 

वेगळ्या पिकांची वाट 
लाखेवाडीचे श्रीमंत ढोले हिमतीचे शेतकरी. परिसरात वेगळ्या पिकाची वाट धरत सात एकरांतील खडकाळ रानावर डाळिंबाची लागवड केली. दहा वर्षे त्यात सातत्यही राहिले. दरम्यान, डाळिंबावर तेलकट डाग, मर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. दरांची साथही मिळेना. इंदापूर भागात तसे स्वच्छ, कोरडे वातावरण असल्याने द्राक्षासाठी पोषक स्थिती असते. मग अभ्यासातून खडकाळ जमिनीत माती भरून २००७ मध्ये द्राक्षाची लागवड केली. त्यात आज सातत्य आहे. 

ढोले यांची शेती 

 • एकूण शेती ११० एकर- (संयुक्त) 
 • लाखेवाडीत ५० एकर, उर्वरीत परिसरातील गावांत. 
 • सुमारे ४५ एकर द्राक्षे, २२ एकर ऊस, १२ एकर ज्वारी, आठ एकर फुले जयवंत चारा, मका 

नियोजनातील महत्त्वाच्या बाबी 

 • फळछाटणीचा अर्ली म्हणजे ऑगस्टचा हंगाम. त्यानंतर दोन ते तीन एकरांचे टप्पे. प्रत्येक पाच दिवसांच्या अंतराने बाग धरली जाते. 
 • नोव्हेंबरमध्ये काढणीचे नियोजन 
 • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार सेंद्रिय, रासायनिक खते, कीडनाशके देण्याचे वेळापत्रक 
 • पूर्वी संजीवके देण्यासाठी डिपींग तंत्र वापरले जायचे. आता इलेक्ट्रोस्टॅटीक यंत्राद्वारे फवारणी. त्यामुळे डिपींगचा वापर थांबवला. 
 • निर्यातीच्या दृष्टीने आयातदार देशांच्या मानांकनानुसार कीडनाशकांचे नियोजन. अवशेषमुक्त मालाचे उत्पादन. 
 • तापमान नियंत्रित करुन मण्यांना तडे जाऊ नये, यासाठी बागेत शेकोट्या 
 • स्लरीचा अधिक वापर, पाचट, काडीकचऱ्याचे, बगॅस मल्चिंगचा वापर 
 • बल्ब, हॅलोजन लॅम्प यांचा गरजेनुसार वापर 

निर्यातीवर भर 
नानासाहेब पर्पल या रंगीत वाणाची लागवड आहे. एकरी १३ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यात १० ते ११ टन माल निर्यातक्षम असतो. उर्वरित मालाची स्थानिक विक्री होते. गेल्यावर्षी एकूण ३७५ टन द्राक्षे निर्यात झाली. श्रीमंत म्हणाले की मागील वर्षी निर्यातीसाठी किलोला ९० रुपयांपासून १४१ रुपयांपर्यंत कमाल दर मिळाले होते. यंदा हे दर ८० रुपयांपर्यंतच आहेत. देशांतर्गत दर ५० ते ६० रुपयांपर्यंत मिळतात. यंदा नैसगिक स्थिती चांगली नाही. त्यातच केंद्र सरकारची निर्यात धोरणे सक्षम नसल्याने गुजरात, काेलकत्ता, बंगळुरू, हैदराबाद आदी बाजारपेठेतच द्राक्षे द्यावी लागत आहेत. निर्यातदारांना ३७ टक्के जीएसटी द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे. यंदा आमची २०० टनांपर्यंत निर्यात होईल, असेही श्रीमंत यांनी सांगितले. 
तिसऱ्या प्रतवारीतील मणी (सुमारे ५० ते ६० टन) नाशिक परिसरातील वाईन उत्पादकांना दिले जातात. त्यास प्रति किलो १० ते १२ रुपये दर मिळतो. 

अन्य शेती 

 • एकूण क्षेत्रातून ७५० ते ८०० टन उसाचा निरा भिमा, कर्मयोगी या साखर कारखान्यांना पुरवठा. 
 • दहा ते १२ एकरांतून ५० पोती ज्वारी. द्राक्षबागेतील मजुरांना त्याचा पुरवठा. 
 • तीन मोठे, चार छोटे टॅक्टर्स. उच्च फवारणी यंत्रे, डस्ट पंप, स्लरी टॅंक, पाने- काड्यांचे कंपोस्ट करणारे यंत्र, ६३ केव्ही क्षमतेचे जनसेट आदी उपकरणे. वीज नसेल त्या वेळी जनसेटच्या मदतीने एका वेळी तीन ते चार वीज पंप चालविणे शक्य. 
 • घरी खाण्यासाठी, आप्तेष्टांना देण्यासाठी कृष्णा, माणिक चमन, मांजरी नवीन, फॅन्टसी, थॉमसन आदी विविध वाणांची लागवड. 

दूध, गोबरगॅस, खत 

 • पन्नास जनावरांचा गोठा आहे. जर्सी, देशी गायींसह म्हशी. 
 • दररोज सुमारे दोनशे लिटर दूध डेअरीला 
 • सुमारे १०० कोंबड्या, शेळ्या. 
 • जनावरांपासून मिळणाऱ्या शेणखतातून शेताची ६० ते ७० टक्के गरज भागते. 
 • पन्नास क्युबीक मीटर क्षमतेचा गोबरगॅस प्लॅंट. त्याद्वारे घरासह दहा मजूर कुटुंबाना गॅस जोडणी 
 • यातील स्लरीचा वापर द्राक्ष बागेत. 
 • जैविक खते व कीडनाशकांचा अधिक वापर. त्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेत वाढ. शेणखत व सेंद्रिय निविष्ठांच्या वापरातून रासायनिक खतांच्या वापरात ३० ते ४० टक्के बचत 

सिंचन 

 • दुष्काळी भाग असल्याने उन्हाळ्यातील पाणी वापरासाठी साडेसहा कोटी, सव्वा तीन कोटी व एक कोटी अशा क्षमतेची तीन शेततळी 
 • नीरा नदीवरील उपसा योजनेतून पाणी भरून ठेवले जाते. 
 • विहिरी आणि बोअरवेलचीही सुविधा. सुमारे ११० एकरांत ठिबक. 
 • पाट पद्धतीचा वापर नाही. चारा पिकांतही ठिबक. 

घरच्यांचे साह्य 
वडील श्री. पोपट, आई सौ. सुशीला, पत्नी सौ. चित्रलेखा यांची साथ आहे. राज्य सरकारच्या सेवेत सचिव असलेले मोठे बंधू दिलीप व विक्रीकर विभागात सहआयुक्त त्यांच्या पत्नी सौ. सुजाता यांचे मोलाचे सहकार्य. इंदापूर येथील राजेंद्र वाघमोडे, बाग व्यवस्थापक दत्तात्रय कांबळे यांचाही मोठा हातभार. 

मजुरांच्या कुटुंबाचे संगोपन 

 • डहाणू, पालघर, बिहार, बंगाल आणि स्थानिक मजुरांना वर्षभर काम. सुमारे १२२ मजूर तैनात. 
 • त्यांच्यासाठी क्वार्टर्स. 
 • त्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात. त्यांना कपडे, दत्पर आदी वस्तूंची मदत. 
 • अनेक वर्षे मजुरांचे येथेच वास्तव्य असल्याने त्यांच्या मुलांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण येथेच झाले. 

संपर्क- श्रीमंत ढोले - ९९२२७०३२९९ 
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
शेतीपूरक, प्रक्रिया व्यवसायातून साधली...लातूर जिल्ह्यातील (ता. उदगीर) भागवत केंद्रे या...
नियोजन खरिपाचे : अत्यल्प खर्चात...दादाराव विश्वनाथ शेजूळ बोरगाव अर्ज(गणपती) ता....
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...