agriculture story in marathi, factors affecting milk standerds | Agrowon

दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानके
शरद पाटील, डॉ. अशोक पिसाळ
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

दुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार होण्यासाठी दूधही तसेच दर्जेदार असायला हवे. परंतु दिवसेंदिवस दुधाचा दर्जा खालावत अाहे. दुधातील घटक त्या-त्या प्राण्याच्या वर्गानुसार आणि स्थितीनुसार वेगवेगळे असतात. निर्भेळ दर्जेदार दूध अळखण्यासाठी दुधाच्या मानकाची माहिती असने अवश्यक अहे.

दुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार होण्यासाठी दूधही तसेच दर्जेदार असायला हवे. परंतु दिवसेंदिवस दुधाचा दर्जा खालावत अाहे. दुधातील घटक त्या-त्या प्राण्याच्या वर्गानुसार आणि स्थितीनुसार वेगवेगळे असतात. निर्भेळ दर्जेदार दूध अळखण्यासाठी दुधाच्या मानकाची माहिती असने अवश्यक अहे.

दुधातील घटक त्या-त्या प्राण्याच्या वर्गानुसार आणि स्थितीनुसार वेगवेगळे असतात. सेवनासाठी प्रामुख्यान्ने गाय व म्हशीचे दूध वापरले जाते. भारत सरकारचा अन्न भेसळ प्रतिबंधक अधिनियम १९७६ नुसार दुधासाठी वेगवेगळी मानके व प्रमाणके ठरविण्यात आली आहेत. ही मानके राज्य व दुभत्या जनवरानिहाय बदलत असतात.

जेव्हा गाय व म्हशीचे दूध असा उल्लेख केला जातो अशा वेळी त्यांच्या कासेतून मिळणारे दूध अपेक्षित आहे. त्यात कोणताही कृत्रिम बदल नसावा. पुढे प्रमाणित दुग्धजन्य घटकापासून बनवलेले टोन्ड दूध म्हणजे फक्त दुग्धजन्य घटक मिसळून वा काढून तयार होणारे दूध होय. येथे दुग्धजन्य घटकाशिवाय इतर कोणताही बाह्य घटक निषिद्ध असतो. स्कीम मिल्कबाबत त्या त्या प्राण्याच्या दुधातील फ़ॅट काढलेले फ़ॅटविरहित दूध अपेक्षित आहे.

प्रमाणित, टोन्ड, डबल टोन्ड दूध
१. प्रमाणित दूध
या प्रकारच्या दुधात स्निग्ध घटक (फ़ॅट) व स्निग्धोतर घन घटक (एस.एन.एफ़) प्रमाणित केले जातात. हे प्रमाण अनुक्रमे ४.५ व ८.५ टक्के असावे. या प्रक्रियेमध्ये ठरवून दिलेल्या माणकापेक्षा जास्तीचे घटक कमी करण्याची वा कमी पडणारे घटक त्यात मिसळण्याची सवलत आहे. मात्र असे करत असताना फ़क्त दुग्धजन्य घटकच वापरणे आवश्यक आहे. इतर कोणतेही रासायनिक घटक नव्हे.

२. दुग्धजन्य घटकापासून बनवलेले दूध
या प्रकारचे दूध हे दुधापासून निर्मित तूप व स्कीम मिल्क पावडर पिण्यायोग्य पाण्यात मिसळून तयार केले जाते. असे करताना त्यातील फ़ॅट ३.० टक्के व एस.एन.एफ़ ८.५ टक्के हवेत.

३. टोन्ड दूध
नियमानुसार आवश्यक ३.० टक्के फ़ॅट व ८.५ टक्के एस.एन.एफ़ प्रमाण राखताना म्हशीच्या दुधात बाहेरून पाणी व स्कीम मिल्क पावडर वापरून टोन्ड दूध तयार केले जाते.

४. डबल टोन्ड दूध
या प्रकारचे दूध करताना, टोन्ड दूध करताना जी प्रक्रिया केली जाते ती तशीच वापरतात. मात्र दुधातील फ़ॅट व एस.एन.एफ़चे प्रमाण अनुक्रमे १.५ टक्के व ९.० टक्के अपेक्षित असते.

वरील सर्व दुधाकरिता दूध प्रक्रिया केंद्रामार्फ़त करावयाच्या सर्व प्रक्रिया म्हणजेच होमोजीनायझेशन, पाश्चराइजेशन, चिलिंग, पॅकिंग, वाहतूक आदी प्रक्रिया नेहमीप्रमाणेच करावयाच्या असतात.भेसळ करण्यासाठी दुधामध्ये कृत्रिम दूध मिसळले जाते किंवा नेहमीच्या दुधात दुग्धजन्य पदार्थाशिवाय इतर खाद्य-अखाद्य रासायनिक घटकांची भेसळ केली जाते.

कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे घटक.
घटक ः प्रमाण (%)
पाणी ः ६०.००
युरिया / डी. डी. टी. ः १०.००
सोयाबीन तेल ः ५.००
मीठ ः २.००
साखर ः ३.००
स्कीम मिल्क पावडर ः ०.१०
ग्लुकोज पावडर ः १०.००
कॉस्टिक सोडा ः आवश्यकतेनुसार

कृत्रिम दूध
कृत्रिम दूध तयार करताना युरिया, डी. डी. टी., कॉस्टिक सोडा, मीठ, साखर, ग्लुकोज पावडर कमी-अधिक प्रमाणात एकत्र मिसळून एकजीव केलेले मिश्रण पाण्यात मिसळतात. पुढे त्यात सोयाबीन तेल व स्कीम मिल्क पावडर मिसळतात. जो द्रव तयार होतो तो व नहमीचे दूध नजरेने ओळखता येत नाही. त्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेची मदत घ्यावी लागते.

दुधात भेसळ का केली जाते?

  • दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी
  • दुधाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी
  • आंबट दूध (जास्त आम्लतेचे) ओळखू न येण्यासाठी
  • SNF (एस.एन.एफ.) राखण्यासाठी

संपर्क ः शरद पाटील, ९६६५२६२४६२
(राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)

टॅग्स

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....