agriculture story in marathi, farm planning in drought, adul, paithan, aurangabad | Agrowon

उत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो
संतोष मुंढे
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पाणीटंचाईने शिकवले 
सन २०१२ मधील पाण्याच्या संकटानं अनेक बाबी शिकवल्या. दोन शेततळी, विहिरी, पाइपलाइनची सोय केली. शेततळ्यातील व प्रसंगानुरून विकत पाणी घेऊन मोसंबीची बाग व रोपवाटिका जगविण्याचे प्रयत्न होतात. प्रत्येक वर्षी शेती उत्पन्नातील निम्मा पैसा पुढील वर्षासाठी गुंतवण्याची सवय ठेवली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला. 

काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ (जि. औरंगाबाद) येथील पिवळ बंधूंनी पाण्यासाठी विविध उपाय केले. प्रत्येक वर्षीच्या उत्पन्नातून निम्मी रक्‍कम शेतीसाठीच खर्ची घालण्याची सवय लावली. प्रसंगी पाणी विकत आणून ते बागेला दिले. मोसंबी बागेला रोपनिर्मितीची जोड देताना कुटुंबातल्या तिघा भावंडांनी शेतीचे पद्धतशीर नियोजन केले. संकटे येत राहिली पण मात करण्याची जिद्द तयार झाली. 

पैठण तालुक्‍यातील आडूळ (जि. औरंगाबाद) येथील सुनील तुकाराम पिवळ व त्यांचे बंधू यांची शेती म्हणजे नियोजनबद्ध शेतीची झलकच आहे. त्यांची संयुक्त साडेदहा एकर शेती. पैकी साडेपाच एकर वडिलोपार्जीत. पाच एकर अलीकडील सात वर्षांत शेतीतील उत्पन्नातूनच घेतली. यंदाप्रमाणे अनेकवेळा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागलं. सन २००२ पूर्वी शेती पारंपरिक होती. पाच एकरांत कपाशी असायची. एकरी २० ते २२ क्‍विंटल उत्पादन काढण्याची किमया पिवळ कुटुंबीयांनी कष्ट व नियोजनातून साधली होती. 

पाणीटंचाईने शिकवले 
सन २०१२ मधील पाण्याच्या संकटानं अनेक बाबी शिकवल्या. दोन शेततळी, विहिरी, पाइपलाइनची सोय केली. सात ते आठ महिने विहिरी चालतात. उर्वरित चार महिने शेततळ्यातील व प्रसंगानुरून विकत पाणी घेऊन मोसंबीची बाग व रोपवाटिका जगविण्याचे प्रयत्न होतात. प्रत्येक वर्षी शेती उत्पन्नातील निम्मा पैसा पुढील वर्षासाठी गुंतवण्याची सवय ठेवली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला. 

नर्सरीची जोड 
मोसंबीच्या बागेला २००७-०८ मध्ये ‘नर्सरी’ची जोड दिली. आता हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत रोपे ‘बुकिंग’ करून नेली जातात. यंदा उत्पादन क्षमता ६० ते ७० हजार रोपांपर्यंत पोचली हे यश म्हणावे लागेल. सुमारे ३५ रुपये प्रतिरोप दर असतो. या व्यवसायातून समाधानकारक रक्कम हाती मिळते. नर्सरीची जबाबदारी बंधू रामेश्‍वर यांच्याकडे आहे. बी लावण्यापासून कलमा बांधणे, त्यांचे संगोपन करून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यापर्यंतचे काम ते पार पाडतात. दुसरीकडे मोसंबीच्या बागेची जबाबदारी सुनील व ज्ञानेश्‍वर पाहतात. फळबागेसाठी हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. 

मोसंबी पीक नियोजन, व्यवस्थापन 

  • वर्ष लागवड  झाडांची संख्या 
  • २००२          ७०० 
  • २०१५-         ४०० 
  • २०१७-         २५० 
  • सन २००८- उत्पादन- ५० किलो प्रतिझाड 
  • २०१० मध्ये- ८० किलोपर्यंत. दोन वर्षांपासून एक ते दीड क्‍विंटलपर्यंत. 

पाण्याच्या शाश्‍वततेसाठी प्रयत्न
मोसंबीची २००२ मध्ये लागवड करताना एक लाख ८० हजार रूपये खर्चून विहीर घेतली. जोड म्हणून २००५ मध्ये शेततळे घेतले. सन २०१२ मध्ये पाण्याची कमतरता जाणवली. त्या वेळी सात लाख रुपयांचे पाणी विकत आणले. सर्व प्रयत्नांतून दहा लाखांपर्यंत उत्पन्न हाती आले. असं संकट पुन्हा येऊ शकतं म्हणून २०१५ मध्ये अडूळ गावतलावाजवळ जागा घेऊन विहीर खोदली. तेथून पाच लाख रुपये खर्चून पाइपलाइन केली. त्याचवर्षी दीड एकरात शेततळे उभारले. त्यासाठी पाच लाख रुपये प्रतिएकरांप्रमाणे दोन एकर जमीन विकत घेतली. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सारी शेती २००४ पासून ठिबकवर आणली. 

दोन टॅंकरद्वारे पाणी 
यंदा पावसाने सुरवात चांगली करून पुढे साथ सोडली. एरवी फेब्रुवारीनंतर घ्यावं लागणारं टॅंकरचं पाणी सप्टेंबरमध्येच सुरू करावं लागलं. दोन शेततळी आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला अन्‌ विहिरीला पाणी आलं की ते शेततळ्यात भरून ठेवण्याचं नियोजन असतं. पावसाळ्याच्या शेवटी शेततळे भरू असं कधी केलं जात नाही. परंतु यंदा पाऊसच अत्यल्प झाला. मोठे शेततळं जवळपास दहा फूट तर छोटं जेमतेम भरता आलं. आंबे बहार चांगला फुलला असतानाचं पाणी गेलं. लगडलेली मोसंबी मिळेल त्या दरात विकावी लागू नये म्हणून दोन टॅंकरने एक दिवसाआड बागेला पाणी दिलं. एक दिवसात सात ते आठ खेपा टॅंकरच्या कराव्या लागतात. दोन हजार रुपये प्रतिटॅंकर खर्च होतो. पण गेल्या महिन्यात ऑक्‍टोबरमध्ये आठ लाख रुपयांना मागितलेल्या बागेचा भाव नोव्हेंबरमध्ये अठरा लाख रुपयांपर्यंत वधारला. आज परिसरात आंबे बहार जवळपास कुणाकडे शिल्लक नाही. पुढे पाणी मिळेल की नाही या चिंतेने सारे बाग विकून बसले. त्यामुळे आता आपल्या मोसंबीला दर मिळेल याची खात्री सुनील यांना आहे. 

शेतीकामे स्वत: करण्याला प्राधान्य 
पाच एकर बागेला वर्षाकाठी किमान ५० ते ६० हजारांचे रासायनिक खत व दोन वर्षात एकदा दीड लाख रुपयांचे शेणखत वापरण्याचा नियम आहे. जवळपास आठ ते दहा फवारण्या, दोन खुरपण्या, मशागतीची कामे होतात. यासाठी अत्यंत गरज असेल तरच मजुरांचा वापर पिवळ बंधू करतात. शक्‍यतो तिघे भाऊ मिळूनचं सर्व कामे नियोजनपूर्वक करतात. 
 
संपर्क- सुनील पिवळ-९७६३८३५२७२  

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेडनेट, रेशीमशेती, भाजीपाला लागवडीतून...विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद...
सुपीक जमीन, नियोजनातून वाढविली...हणमंतवडिये (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील राहुल...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...