Agriculture story in Marathi, farmers planning | Agrowon

शेततळे, ॲटोमेशनमुळे ९० एकर क्षेत्र झाले अोलीत
माणिक रासवे
शनिवार, 3 मार्च 2018

शेतकरी ः एकनाथराव साळवे
सिंगणापूर (ता. जि. परभणी)

 
सिंगणापूर (ता. जि. परभणी) शिवारामध्ये साळवे कुटुंबाची ९० एकर शेती आहे. सिंचनासाठी आठ विहिरी अाहेत. सव्वा कोटी आणि सव्वा दोन कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या दोन शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे. त्यांनी संपूर्ण शेती स्वंयचलित संगणकीय ठिबक सिंचन प्रणालीद्वारे ओलिताखाली आणली आहे.

शेतकरी ः एकनाथराव साळवे
सिंगणापूर (ता. जि. परभणी)

 
सिंगणापूर (ता. जि. परभणी) शिवारामध्ये साळवे कुटुंबाची ९० एकर शेती आहे. सिंचनासाठी आठ विहिरी अाहेत. सव्वा कोटी आणि सव्वा दोन कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या दोन शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे. त्यांनी संपूर्ण शेती स्वंयचलित संगणकीय ठिबक सिंचन प्रणालीद्वारे ओलिताखाली आणली आहे.

  • ऊस, केळी, हळद, आले यासह अन्नधान्य, फळपिके तसेच कांदा बीजोत्पादन घेतले जाते. सध्या साळवे यांच्याकडे ३० एकर ऊस, ६ एकर केळी, २ एकर लिंबू, ४ एकर हळद, ५ एकर आले, ४ एकर सीताफळ, ५ एकर डाळिंब, २ एकर ज्वारी, २ एकर गहू, २ एकर टोमॅटो, २ एकर चारा पिकांची लागवड केलेली आहे.
  • उपलब्ध पाण्याचा काटेकोर अाणि कार्यक्षमरीत्या वापर होण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने संपूर्ण ९० एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. पारंपरिक पाटपाणी पद्धतीने केवळ आठ तास मिळणाऱ्या वीजपुरवठ्यावर ९० एकर क्षेत्र ओलिताखाली आणणे शक्य झाले नसते. त्यामुळे प्रवाही पाण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली आहे.
  • गेल्या सात वर्षापासून सर्व पिकांना गरजेनुसार पाणी देण्यासाठी शेतावर स्वयंचलित संगणक प्रणाली कार्यान्वित केली. पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार संगणकावर प्रोग्रॅम फीड केला जातो. त्यामुळे पिकांना वेळेच्या वेळी अाणि मोजून गरजेएवढे पाणी मिळते.
  • मार्चनंतर विहिरींमधील पाणी कमी होत जाते. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून शेततळ्यांची उभारणी केली आहे. विहिरींमध्ये पाण्याची आवक सुरू असते तोपर्यंत विद्युत पंपाने विहिरीतील पाणी उपसून दोन्ही शेततळी भरून घेतली जातात.यामुळे पिकांना संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण बसत नाही.
  • गेल्या काही वर्षापासून वर्षाआड आमच्या भागात दुष्काळ पडत आहे. अवर्षणाच्या स्थितीत सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेततळ्यांतील संरक्षित पाण्याचा काटेकोरपणे वापर करत उत्पादन घेत आहोत.

संपर्क ः एकनाथराव साळवे ः ९८६०७९१८५८

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...