agriculture story in marathi, farming planning in drought condition, sonavadi supe, baramati, pune | Agrowon

दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी झेंडूही
संदीप नवले
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

‘अॅग्रोवन’चे दहा वर्षांचे अंक संग्रहित 
तपन यांनी दहा वर्षांपासूनचे अॅग्रोवन’चे अंक संग्रही ठेवले आहेत. त्यातील लेख, यशोगाथांचे ते नियमित वाचन करतात. यशोगाथा प्रसिद्ध झालेल्या असंख्य शेतकऱ्यांच्या शेतांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. यशकथेतील शेतकऱ्यांशी त्यांचा मोबाईलद्वारेही संपर्क असतो. शेतीला सुरवात करण्यापूर्वी 
महाराष्ट्रासह गुजरात व अन्य राज्यांतील अनेक शेतकऱ्यांची शेती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे. 

मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन हरचांदे मूळ कोकणवासीय शेतकरी. 
शेतीची आवड व वेगळे काही करण्याच्या ध्येयाने सोनवडी सुपे (जि. पुणे) परिसरातील ७५ एकर शेती त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली. त्यातील २५ एकरांत दुष्काळाच्या झळा सोसत जिद्दीने आधुनिक तंत्राच्या आधारे शेवगा व त्यात आंतरपीक झेंडू फुलवला आहे. असंख्य शेतकऱ्यांच्या शेतांना भेट, अॅग्रोवनचे वाचन याद्वारे आपली शेती संपन्न करण्याचे त्यांचे प्रयत्न उमेद जागवणारे ठरणारे आहेत. 

उच्चशिक्षित असलेले तपन पांडुरंग हरचांदे हे मूळचे मालवण (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील नांदोस येथील आहेत. ते मुंबईकर आहेत. नवी मुंबईतील वाशी येथे १९९९ पासून गणित व विज्ञान विषयांचे त्यांचे कोचिंग क्लासेस आहेत. त्यांना शेतीची आत्यंतिक आवड. कोकणातील त्यांच्या शेतीत कूळ कायदा किंवा अन्य तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्यामुळे मग जवळच कोठेतरी शेती करावी, असे त्यांच्या मनाने ठरवले. 

बारामती भागात ‘लीज’वर शेती 
शेती भाडेतत्त्वावर (लीज) घेण्याचा उपाय अखेर मिळाला. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील जिरायती आणि दुष्काळी सोनवडी सुपे गावाच्या पश्चिमेला सुमारे अडीच किलोमीटरवर जळगाव- सुपे रस्त्याला लागून जाधववस्ती आहे. त्यालगत श्रीधर बालन यांच्या सहकार्याने बाळासाहेब रेवडे यांची आठ एकर शेती घेतली. हळूहळू परिसरातील सुमारे सात शेतकऱ्यांचीही शेती कसायला घेतली. शेती घेण्यापूर्वी पीकपद्धती व मार्केटचा पुरेपूर अभ्यास केला. 

शेती व पीकपद्धती 

 • सुमारे ७५ एकर शेती भाडेतत्त्वावर - मार्च २०१६ मध्ये. 
 • श्रीजी अॅग्रो नॅचरल फार्म असे नामकरण. मित्र पोपट लोणकर, राजाभाऊ थोपटे यांची मदत 
 • सध्या २५ एकर क्षेत्र विकसित. त्यात ठिबक, गादीवाफा व पॉलिमल्चिंग पद्धत 
 • मुख्य पीक - शेवगा. त्यात आंतरपीक झेंडू (२५ एकरांत) 
 • झिगझॅग पद्धतीने कोईमतूर वाणाची एकरी साडेसहाशे प्रमाणात शेवग्याची लागवड 

दुष्काळातही सकारात्मकता 
यंदा सोनवडी सुपे भागात पाऊस जवळपास झालाच नाही. सरकारी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलीकडील काही वर्षे परिसर दुष्काळ सोसतो आहे. अशा स्थितीत माळरानावर झेंडूचे आकर्षक रंग फुलवण्याची किमया तपन यांनी साधली आहे. सुरवातीला जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष दिले. त्यासाठी तब्बल ३५ एकरांत ताग, धैंचा अशी हिरवळीची पिके घेतली. त्यानंतर हरभरा, ज्वारी यासह चारा पिके घेतली. 

पाण्यासाठी सर्व काही 

 • सुरवातीला गावातील जमीन, पडणारा पाऊस, उपलब्ध पाणी, हवामान यांची माहिती घेतली. 
 • विहिरींची अवस्था, पाण्याचे स्रोत, शिरसाई उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्याचे आवर्तन यांचा अभ्यास केला. दरवर्षी पाण्याचे असलेले दुर्भिक्ष पाहून पाण्याची सुविधा करण्यावर भर दिला. 
 • सध्या एक कोटी लिटर व २५ लाख लिटर क्षमता अशी दोन शेततळी 
 • बाष्पीभवन होऊ नये, तणांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पॉलिमल्चिंग 
 • सुमारे २५ एकरांत मल्चिंग अंथरायचे असल्याने गुजरातमधून यंत्र मागवून कमी कालावधीत हे काम साधले. 
 • लागवडीखालील क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर 
 • वेगवेगळ्या ठिकाणावरून सोळा देशी गायी आणल्या. 
 • शेणखत वा जीवामृत फिल्टर करून द्रवरूप स्लरी शेताला देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर. चोवीस सिमेंट टाक्यांची एकमेकांना जोडणी करून व्यवस्था. 
 • नैसर्गिक शेतीवर संपूर्ण भर. आठवड्याला सुमारे ३५ हजार लिटर जीवामृत तयार करण्यात येते. महिन्यातून तीन वेळा ठिबकद्वारे ते दिले जाते. 
 • पीक संरक्षणासाठी दशपर्णी अर्काची फवारणी 
 • सुरवातीला यंत्रांच्या साहाय्याने बांधबंदिस्ती करून शेती लागवडीयोग्य केली. दोन नवे बोअरवेल्स घेतले. पूर्वीच्या तीन विहिरी होत्या. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता झाल्यानंतर माळरानाचा विकास होण्यास मदत झाली. 
 • शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतरस्ते व्यवस्थित करण्यावर भर दिला. शेताच्या मध्यभागी सुमारे वीस ते पंचवीस फूट लांबीचा रस्ता बनवला. 
 • तीन फूट रुंद व एक ते दीड फूट उंचीचे बेड तयार केले. त्यावर झेंडू, शेवगा पिके चांगली घेऊन उत्पन्न वाढविण्यावर भर 
 • गावात वीजटंचाई असल्यामुळे साडेसात एचपीचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभा केला आहे, त्यामुळे विजेचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली. पिकांना दिवसभर पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली. 
 • मल्चिंग पेपरचे अथवा पिकांचे कुत्री व अन्य जनावरांपासून नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण फार्मला सौरऊर्जेचे संरक्षक तारेचे कुंपण केले आहे. 
 • उत्पादन- शेवग्याची रोपे सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. आंतरपीक झेंडूचे (कोलकता वाण) 
 • नऊ एकरांतील उत्पादन हाती आले आहे. एकरी दीड ते दोन टन उत्पादन मिळाले. 
 • अन्य १५ एकरांतील झेंडूचा पहिला तोडा झाला असून, सुमारे सहा टन विक्री झाली आहे. 
 • किलोला ३० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. 

बेरोजगार महिलांना मिळाला रोजगार 
माळरानावर शेती फुलल्याने सणांच्या काळामध्ये परिसरातील सुमारे ८० ते १०० महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. या सर्व महिला जळगाव सुपे, कप, देऊळगाव रसाळ, कारखेल या भागातील आहेत. या महिलांना दररोज १७० रुपये मेहनताना मिळतो. वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. 

- तपन पांडुरंग हरचांदे - ८८७९४७१६६६ 
- श्रीधर बालन - ९८२०७२१३०८ vv

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...