agriculture story in marathi, feeding management of livestock | Agrowon

दुधाळ जनावरांसाठी संतुलित, संपूर्ण आहार तंत्रज्ञान
डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे, डॉ. वैशाली बांठिया
शुक्रवार, 16 मार्च 2018

संतुलित आहार व संपूर्ण आहार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या आहारामध्ये शरीराला आवश्‍यक सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात असतात अशा आहाराला संतुलित आहार म्हणतात. तर संपूर्ण आहार तंत्रज्ञान किंवा संपूर्ण आहार पद्धत म्हणजे ज्या पद्धतीत संपूर्ण पोषण द्रव्ये ही एकत्र मिसळून जनावरांना वेगळी न देता एकाच वेळेस खायला घालतात.

अाहारातील क्षाराची अावश्‍यकता

संतुलित आहार व संपूर्ण आहार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या आहारामध्ये शरीराला आवश्‍यक सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात असतात अशा आहाराला संतुलित आहार म्हणतात. तर संपूर्ण आहार तंत्रज्ञान किंवा संपूर्ण आहार पद्धत म्हणजे ज्या पद्धतीत संपूर्ण पोषण द्रव्ये ही एकत्र मिसळून जनावरांना वेगळी न देता एकाच वेळेस खायला घालतात.

अाहारातील क्षाराची अावश्‍यकता

 • जनावरांच्या चयापचय क्रियेसाठी.
 • शारीरिक वाढीसाठी अाणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी.
 • रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अाणि दूध उत्पादन टिकून राहण्याकरिता.
 • गर्भातील वासराच्या वाढीसाठी अाणि प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते.

संपूर्ण आहार तयार करण्याच्या पद्धती

 • चाऱ्याचे बारीक तुकडे करून (कुट्टी) त्यामध्ये खुराक मिश्रण योग्य प्रमाणात मिसळतात.
 • भुकटी करून तयार केलेला चारा ज्यामध्ये दळताना आवश्‍यक तेवढे खुराक मिश्रण घालतात.
 • खाद्य कांड्या ः चारा बारीक करून त्यात आवश्‍यक तेवढे खुराक मिश्रण मिसळून खाद्यकांड्या तयार करतात. या पद्धतीत खाद्य वाया जाण्याचे प्रमाण १६ टक्‍क्‍यांवरून २ टक्‍क्‍यांवर जाते.
 • खाद्य ठोकळे (भेली) ः शेतातील पिकांच्या अवशेषांचा वापर खाद्य ठोकळे तयार करण्यासाठी करतात. यामध्ये पोषणमूल्ये वाढवण्यासाठी बाजरी, मका, भुईमुगाची ढेप, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये, खनिजे, क्षार, मीठ याचा वापर केला जातो.

संपूर्ण आहार तंत्रज्ञानाचे फायदे

 • आहारामधील कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम अाणि क्षारांचा दूध उत्पादन व चायपचयामध्ये प्रमुख उपयोग होतो
 • खाद्याचा अपव्यय होत नाही.
 • अॅसिटिक ॲसिड व प्रोपिऑनिक ॲसिड तयार होण्याचे प्रमाण योग्य राहून दुधातील स्निग्धाचे प्रमाण राहते.
 • संपूर्ण आहार पद्धतीमध्ये चारा कमतरतेच्या काळात टाकाऊ चारा, अाणि शेतीतील उपपदार्थ वापरून जनावरांकरिता संतुलित आहार तयार करता येतो.
 • खाद्य ठोकळ्यातून जनावरांना आवश्‍यक असणाऱ्या एका दिवसाच्या चाऱ्याची गरज पूर्ण होते अाणि जनावरांना आवश्‍यक पशुखाद्य मिळते.
 • झिंक, मॅंगेनीज, सेलेनियम, आयोडीन यांसारखे सूक्ष्म क्षार रोगप्रतिकारकशक्ती तसेच प्रजनन कार्यात अत्यंत गरजेचे आहेत.
 • क्षार मिश्रणामुळे खाल्लेल्या आहाराची पाचकता सुधारते.
 • वासराची वाढ जोमाने होते.
 • गाभणकाळाच्या शेवटच्या काही दिवसांत होणारे आजार तसेच चयापचयाचे अाजार (दुग्धज्वर, किटोसिस इ.) नियंत्रणात राहतात.
 • जनावरांची प्रजननक्षमता चांगली होऊन उत्पादन वाढते.
 • हिरवा तसेच सुका (वाळलेला) चारा कुट्टी करून देणे, चाऱ्याचे १ ते २ इंच आकाराचे तुकडे करून देणे किंवा सुकलेला व हिरवा चारा एकत्र करून दिल्याने जनावरे चारा आवडीने खातात. कुट्टी करून दिल्याने चारा वाया जात नाही.
 • जनावरांना सतत चारा देऊ नये त्यामुळे जनावरे रवंथ करत नाहीत. दिवसातून साधारणपणे २ ते जास्तीत जास्त ३ वेळा चारा द्यावा.
 • जास्त दूध देणाऱ्या जनावरांना चांगल्या प्रतीचे पशुखाद्य द्यावे. त्यामध्ये काही पोटात विरघळणारे तर काही न विरघळणारी बायपास प्रथिने असावीत. त्यामुळे जनावराची दूध उत्पादन क्षमता टिकून राहते.

संपर्क ः डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे, ९४२०६४२४०९
(नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...