Agriculture story in marathi, food processing in india | Agrowon

पायाभूत सुधारणेतून मिळेल अन्न प्रक्रियेला चालना
गणेश शिंदे, बालाजी रुद्रवार
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि कोल्ड चेनमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे भारतात फळे आणि भाज्यांचे दरवर्षी सुमारे ४.६ ते १५.९ टक्के नुकसान होते. नुकसानीचा स्तर कमी करण्यासाठी आणि प्रक्रियायुक्त अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात मूलभूत सुविधा, प्रक्रियेतील संशोधन आणि विकास कौशल्य वाढविण्याची गरज अाहे.

काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि कोल्ड चेनमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे भारतात फळे आणि भाज्यांचे दरवर्षी सुमारे ४.६ ते १५.९ टक्के नुकसान होते. नुकसानीचा स्तर कमी करण्यासाठी आणि प्रक्रियायुक्त अन्नाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात मूलभूत सुविधा, प्रक्रियेतील संशोधन आणि विकास कौशल्य वाढविण्याची गरज अाहे.

 • जागतिक स्तरावरील अन्नधान्य उत्पादनांच्या बाबतीत भारत चीनच्या पुढे आहे. दूध, केळी, आंबा, पेरू, पपई, आले, भेंडी आणि मांस निर्मितीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो.
 • वाटाणा, बटाटे, चहा, टोमॅटो, तीळ आणि इतर अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • अन्नप्रक्रिया क्षेत्रातील रोजगार आणि रोजगाराच्या दृष्टीने कारखान्यांची संख्या आणि उत्पादन दृष्टीने तिसऱ्या स्थानी आहे.

जागतिक स्तरावर अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये भारत

 • इतर विकसित देशांच्या तुलनेत देशातील प्रक्रियेचे प्रमाण फारच कमी आहे. भारत (सुमारे १० टक्के), अमेरिका (८० टक्के), मलेशिया (८० टक्के), अफारन्स (७० टक्के), थायलंड (३० टक्के), ऑस्ट्रेलिया (२५ टक्के)
 • भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगातील धान्य, साखर, खाद्यतेल, पेये व डेअरी उत्पादने हे प्रमुख उद्योग अाहेत.
 • अन्न-आयात करण्यासाठी देशाचे धोरणात्मक भौगोलिक स्थान आणि प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीसाठी भारत अनुकूल आहे.
 • भारतात फळे आणि भाज्यांमध्ये २ टक्के, समुद्री मासे १०.५ टक्के, मांस २.७ टक्के आणि कुक्कुटपालनामध्ये ६.७ टक्के प्रक्रियेचे प्रमाण अाहे.
 • भारतात २०१३-१४ मध्ये प्रक्रिया उद्योगामध्ये ७.१ टक्के वाढीची नोंद आहे. इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार (एएसआय) देशातील नोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगांची एकूण संख्या ३७,१७५ आहे. तमिळनाडू (१४ टक्के), तेलंगणा (१० टक्के), महाराष्ट्र (८ टक्के) आणि पंजाब (७.५ टक्के)  या राज्यांतील नोंदणीकृत खाद्यान्न आहे.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची मेगा फूड पार्क योजना

 • अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे (MoFPI) भारत सरकार ४२ मेगा फूड पार्क उभारत आहे. त्यापैकी ३५ मंजूर झालेले आहेत.
 • पायाभूत सुविधांसह या फूड पार्कमध्ये १,२०० विकसित भूखंड (प्रत्येकी १ एकर) आहेत, जे उद्योजकांना अन्नप्रक्रिया आणि सहायक युनिट स्थापन करण्यासाठी भाडे करार तत्त्वावर मिळू शकतात.

क्षेत्रानूसार अन्नप्रक्रियेच्या संधी
१. डेअरी क्षेत्र

 • भारतात सुमारे १४६ दशलक्ष मेट्रिक दुधाचे उत्पादन होते. २०२० पर्यंत भारताचे दुग्धोत्पादन १८० दशलक्ष मेट्रिक टन्सपर्यंत पोचेल अशी अपेक्षा असून, एनडीडीबीद्वारे जाहीर केलेल्या मागणी अहवालानुसार २०० दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.
 • वाढती मागणी लक्षात घेऊन डेअरी उत्पादनांच्या बाजारपेठेत फ्लेवर्ड दही, लोणी, सुगंधी दूध, चीज इत्यादीची निर्मिती होणे गरजेचे अाहे.
 • नवीन मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, आधुनिक पॅकेजिंग तंत्र, व्हॅल्यू ऍडेड डेअरी प्रॉडक्‍ट, प्रोसेसिंगसाठी कोल्ड चेन आणि नवीन टेक्‍नॉलॉजीची क्षमता वाढवणे अावश्‍यक अाहे.

२. फळे आणि भाजीपाला

 • केळी, पपई, आंबा आणि पेरूच्या उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहेच. तसेच बटाटे, मटार, कोबी आणि फूलकोबी उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
 • आधुनिक प्रक्रिया तंत्र आणि कोल्ड चेन यांसारख्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने भारतात दरवर्षी सुमारे ४.६ ते १५.९ टक्के फळे अाणि भाज्यांचा अपव्यय पाहतो.
 • पुरेशा पायाभूत सोयी (कोल्ड चेन, प्रक्रियेच्या पायाभूत सोयीसुविधा), खाद्य प्रकिया आणि पॅकेजिंग यांसह अपव्यय पातळी कमी करण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रचंड संधी आहे.

३. मांस आणि पोल्ट्री

 • भारतात दरवर्षी ५.३ दशलक्ष मेट्रिक मांस निर्मिती होते. कुक्कुटपालनविषयक कचरा ६.७ टक्केपेक्षा जास्त आहे, तर मांसमध्ये ते २.७ टक्के आहे.
 • कुक्कुटपालनात प्रक्रियेचे प्रमाण ६ टक्के आहे, तर मांसामध्ये २१ टक्के आहे.
 • स्वच्छ आणि सुरक्षित मांस उत्पादनासाठी भारतीय ग्राहकांच्या मागणीनुसार प्रक्रिया आणि कोल्ड चेनमध्ये पायाभूत सुविधांमध्ये मोठी संधी आहे.

४. सागरी उत्पादने

 • ९.६ दशलक्ष मेट्रिक उत्पादनासह भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. भारताला समुद्री आणि अंतर्देशीय मासेमारीसाठी उपयुक्त असे भौगोलिक स्थान लाभले अाहेत. अंतर्देशीय मत्स्य व्यवसायामध्ये ५.२ टक्के उत्पादनाचा अपव्यय होतो. तर सागरी मत्स्य व्यवसायामध्ये १०.५ टक्के अपव्यय होतो.
 • भारतात २३ टक्के सागरी उच्पादनांवर प्रक्रिया होते. समुद्री उत्पादनांच्या साठवणुकीसाठी अावश्‍यक असणाऱ्या शीतसाहित्याच्या विकासासाठी भारतामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहे.

५. कोल्ड चेन
भारतात दरवर्षी ४०० दशलक्ष मेट्रिक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होतात. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (डिसेंबर २०१४ मध्ये) केलेल्या बेसलाइन सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार भारतात एकूण ३१.८ दशलक्ष मेट्रिक टन कोल्ड स्टोरेजची क्षमता आहे.

भारतातील शीतगृहे, सीए स्टोरेज, पिकविण्यासाठी चेंबर्स, आयसीएफ, दूध शीतकरण आणि प्रक्रियेमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाव अाहे.

निर्यात परिस्थिती

२०१४ - १५ मध्ये भारताने प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची निर्यात ३६.२ अब्ज डॉलर इतकी होती. त्यात आंबा पल्प, वाळलेल्या भाज्या इतर प्रक्रिया केलेले, एफ अँड व्ही, डाळी, शेंगदाणे, गूळ व कन्फेक्‍शनरी, कोका उत्पादने, अन्नधान्य, पशू उत्पादने इ. समावेश होतो. तसेच भारतासमोर इतर प्रमुख देशांमध्ये प्रक्रिया केलेले अन्नधान्य निर्यात करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.
माहिती स्रोत ः अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय भारत सरकार

संपर्क ः गणेश शिंदे, ८३२९१२८४०४
(अन्न व्यापार व व्यवसाय व्यवस्थापन विभाग, के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

इतर कृषी प्रक्रिया
शेतमाल निर्यातीसाठी ‘हॉर्टीनेट` प्रणालीसन २०१६-१७ पासून राज्यात ग्रेपनेट, मॅंगोनेट,...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीन हे ४० टक्के प्रथिने आणि २० टक्क्यांपेक्षा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
फळे, भाजीपाला उत्पादन, निर्यातीत...राज्यातील शेतकऱ्यांचा निर्यातक्षम दर्जाच्या...
फुले ०९०५७ : गुळासाठी उसाची नवीन जातसध्या गूळनिर्मितीसाठी उसाची को ९२००५ ही जात...
बीटचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ   भरपूर पोषण तत्त्व असलेल्या...
सुपारी सोलणी यंत्राबाबत माहिती...सुपारी फाळसटणी यंत्र या यंत्रामध्ये एक...
धान्य साठवणीसाठी आधुनिक सायलो तंत्रज्ञानपिकांची काढणी ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे...विविध खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक...
आधुनिक, पायाभूत सुविधांच्या...औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगारनिर्मिती...
आवळ्यापासून बनवा मुरावळा, लोणचे, कॅण्डीकच्च्या स्वरूपामध्ये आवळ्यामध्ये आरोग्यदायी...
पायाभूत सुधारणेतून मिळेल अन्न...काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि कोल्ड चेनमधील पायाभूत...
जपानी तंत्राच्या ‘राइस मिल’द्वारे...तंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणे तेव्हाच शक्य होते,...
घरगुती प्रक्रियेद्वारे बोरांचे...बोर हे अत्यंत पोषक, तरिही दुर्लक्षित फळ आहे....
सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीरसोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थतृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा...
लिंबू प्रक्रियेतून मिळतील रोजगाराच्या...औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थ तृणधान्यापासून तयार केलेल्या पारंपरिक ...
स्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिचीलिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ...
सीताफळ गरापासून श्रीखंड, सरबत, रबडीसीताफळ हे पाैष्टिक फळ असून, त्याच्या गरापासून...