Agriculture story in Marathi, food security | Agrowon

फळे, भाजीपाला उत्पादन, निर्यातीत अन्नसुरक्षा महत्त्वाची...
गोविंद हांडे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

राज्यातील शेतकऱ्यांचा निर्यातक्षम दर्जाच्या शेतमालाचा उत्पादन कल वाढत आहे. खुल्या जागतिक व्यापारामध्ये शेतमाल निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याचबरोबर अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध अटींची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा निर्यातक्षम दर्जाच्या शेतमालाचा उत्पादन कल वाढत आहे. खुल्या जागतिक व्यापारामध्ये शेतमाल निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याचबरोबर अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध अटींची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
खुल्या जागतिक व्यापार करारामुळे शेतमाल निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असल्या तरी काही आव्हानेही निर्माण झाली आहेत. कृषी माल निर्यातीबरोबरच गुणवत्ता, कीड व रोगमुक्त, उर्वरित अंशाची हमी, अन्नसुरक्षा तसेच वेष्ठणे व निर्यात होणाऱ्या मालीच थेट शेतापर्यंतची ओळख इत्यादी बाबींना जागतिक बाजारपेठेबरोबरच स्थानिक बाजारपेठेतही विशेष महत्त्व आहे.

 • स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली आहे. कीटकनाशकांच्या उर्वरित अंशामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता सेंद्रिय प्रमाणित शेतीमाल व कीडनाशके उर्वरित अंश मुक्त शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने फूड सेफ्टी स्टॅंडर्ड ॲक्‍ट २०११ अन्वये कृषी मालाची कीडनाशके उर्वरित व हेवी मेटलच्या अंशाच्या अधिकतम मर्यादा निर्धारीत केली. तसेच कीटकनाशकांचे मानवी आरोग्य आणि प्राण्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कीडनाशकांचा सुरक्षित व सामंजसपणे वापर करून सुरक्षित अन्न उत्पादन करण्याकरिता ‘ग्रो सेफ फूड` या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली.
 • फळे व भाजीपाला पिकातील कीडनाशकांचे उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता शासनाच्या पुणे व नागपूर येथे कीडनाशके उर्वरित अंश प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोगशाळेमार्फत स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यातीकरिता फळे व भाजीपाला तपासणीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे अपेडाद्वारे खासगी एनएबील प्रमाणीत कीडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळांनाही प्राधिकृत केले आहे.
 • केंद्र शासनाने प्रमुख फळे व भाजीपाला पिकावरील कीड आणि रोगांच्या नियंत्रणाकरिता फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने कायदेशीर प्रमाणित केलेल्या (लेबल क्लेम) कीडनाशकांचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. म्हणून येथून पुढे फळे व भाजीपाल्यातील कीडनाशके उर्वरित अंशमुक्तची हमी देण्याकरिता लेबल क्‍लेम कीडनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.

राज्याचे चित्र

 • द्राक्ष, डाळिंब, आंबा, कांदा व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन.
 • देशाच्या एकूण निर्यातीपैकी ९८ टक्के द्राक्ष, ७६ टक्के आंबा, ४९ टक्के कांदा, २७ टक्के इतर फळे, १८ टक्के इतर भाजीपाल्याची महाराष्ट्रातून निर्यात.
 • एकूण देशाच्या तुलनेत फळे, भाजीपाला, फुलांतर्गत ७.७ टक्के क्षेत्र, देशाच्या १०.७ टक्के उत्पादन.
 • देशात फळांचे उत्पादन, निर्यातीमध्ये अग्रेसर

  देशातून होणारी निर्यात ः
  भारतातून फळे, भाजीपाला व फुले यांची युरोपीय संघ आणि इतर देशांत निर्यात वाढत आहे. सन १९७७-८८ मध्ये १४८ कोटी, १९९४-९५ मध्ये ५२६ कोटी आणि २०१६-१७ मध्ये १७,६३३ कोटींची फळे, भाजीपाला व फुले यांची निर्यात झाली. दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. ही वाढ टिकून ठेवण्यासाठी अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रमुख फळपिके, भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
   

भारत आणि महाराष्ट्रातील फळे, फुले, भाजीपाल्याची लागवड आणि उत्पादन.

पिके क्षेत्र (००० हेक्टर) उत्पादन (००० मे. टन) महाराष्ट्राची टक्केवारी
भारत महाराष्ट्र  भारत महाराष्ट्र  भारत महाराष्ट्र
फळे   ७,२१६  ७४१     ८८,९७७  १२,१६२   १०.००    १३.६०
फुले     २५५   ८ २,२९६ ४४५   ३.१०   १९.३०
भाजीपाला   ९,३९६   ५५७   १,६२,८९६  १४,७९५     ५.९०    ९.००
एकूण  १६,८६७    १,३०६      २,५४,१६९  २७,४०२       ७.७४    १०.७८

२०१६-१७ मधील देशातून ताजा भाजीपाला, इतर कृषीमाल निर्यात (निर्यात ः टन आणि मूल्य कोटी रुपये)

कृषिमाल   महाराष्ट्र   भारत  राज्याचा हिस्सा (%)
निर्यात निर्यातमूल्य    निर्यात निर्यातमूल्य    निर्यात निर्यातमूल्य   
कांदा   १३१०२७४  १७०४    २४१५७५५ ३१०६    ५४  ५५
इतर भाजीपाला    १९७०५५ ८२४  १००२३९५    २८१५    २० २९
फुले  १५०५.९३ ७७.३३  २२०८५.४७   ५४८.७३  १४
आंबा पल्प  २३१७०.३३ १७५ ४७ १३५६२०.६८   ८६४.९४  १७  २०
इतर प्रक्रिया केलेली फळे व भाजीपाला  ११९८८५.६१   १०५३.५१   ३५१८३३.३३  ३११६.०७    ३४   ३४

संपर्क ः गोविंद हांडे , ९४२३५७५९५६
(तंत्र अधिकारी (निर्यात कक्ष), कृषी आयुक्तालय, पुणे)

 

इतर कृषी प्रक्रिया
सीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
प्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...
टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
विविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....
प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...
अाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...
पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...