Agriculture story in marathi, Forwaed market for agriculture commodities | Agrowon

कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतर शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.
 

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका, सोयाबीन व हरभरा यांचे भाव वाढले. इतर शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील व गव्हातील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, हळद, गवार बी आणि हरभरा यांचे भाव वाढतील.
 
चालू वर्षी भारतातील सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. इराण मध्येही मागणी वाढत आहे. सोयाबीन असोसिएशनने या वर्षी सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ३८ टक्क्याने अधिक असेल असा अंदाज केला आहे. हरभ-याचा व्यापा-यांकढील साठा कमी होत आहे. हरभ-याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र शासनाचा साठा भाव वाढीवर नियंत्रण करेल. पशु-खाद्याची मागणी वाढती आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या ३ टक्क्याने वाढून रु. १,५५० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०५८ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रबी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारी मध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१८० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,७९६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८५९ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ फेब्रुवारी रोजी एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,८४०, ३,८८१, ३,९२२, ३,९६३, ४,००४ व ४,०४५ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या महिन्यातसुद्धा घसरण होत आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने किमती १.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,२४८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,४३४ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५५४). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.

गहू
गव्हाच्या (मार्च २०१९) किमती गेल्या सप्ताहात ७.२ टक्क्यांनी घसरून रु. १,९६० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.८ टक्क्यांनी घसरून रु. १,९४५ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १२.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८३४). रबी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावापेक्षा जवळ असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१ व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२३१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२२२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३२८). खनिज तेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने वाढून रु. ४,२७४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४०४). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रबीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २०,३९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,२६० वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरात मधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र निर्यात मागणी वाढली तर हि घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com

 

इतर अॅग्रोमनी
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...