agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

सोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

या सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ गवार बीमध्ये (६.४ टक्के) होती. सर्वात अधिक घट मक्यात (१.५ टक्के) झाली.
सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन वगळता इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ गवार बीमध्ये (६.४ टक्के) होती. सर्वात अधिक घट मक्यात (१.५ टक्के) झाली.
सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन वगळता इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात मान्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाउस आता फक्त उत्तर-पूर्व प्रदेश, बिहार, झारखंड व रायलसीमा येथेच झालेला आहे. इतरत्र तो सरासरी इतका किंवा अधिक झाला आहे. पुढील सप्ताहात बिहार व झारखंड येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल, हा अंदाज बरोबर ठरेल असे दिसते. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन त्यामुळे वाढेल. पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल, असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. १ ऑगस्टपासून एनसीडीइएक्समध्ये डिसेंबर २०१८ डिलिवरीसाठी मका (खरीप व रबी), हळद व गहू यांचे आणि जानेवारी २०१९ डिलिवरीसाठी गवार बी यांचे व्यवहार सुरू झाले. एमसीएक्समध्ये जानेवारी २०१९ डिलिवरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरत रु. १,२७१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२०२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३३१ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे. पण मागणीसुद्धा वाढती आहे. खरीप मकाचा (सांगली) नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता).

साखर
साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,२२६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२१३ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या (२०१८) फ्युचर्स किमती रु. ३,२२६ वर आल्या आहेत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,३९२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५६५ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३७१, रु. ३,४१४, रु. ३,४५७ व रु. ३,५०० आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७,०९२ व रु. ७,५२८ दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ७,२७२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,४५६). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या रु. १,९७२ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९४२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०१०). पुढील दिवसात वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या महिन्यातसुद्धा तोच काल कायम आहे. गेल्या सप्ताहात त्या ०.१ टक्क्याने वाढून रु. ४,१८६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ६.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,४५३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ६.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,३५३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४८३).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ यादरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,२२० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२६९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३५४). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). गेल्या त्या १.६ टक्क्यांनी घसरून २३,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढून २४,१२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,२६७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८च्या फ्युचर्स किमती अनुक्रमे रु. २३,६४० व रु. २३,५०० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहेत. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

 

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
संत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...
‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना...पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या...
सोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घटया सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या...
चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला...चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची...
शेतमालाच्या विपणनातील अडचणी अन्...शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी...
देशात खतांची टंचाई नाहीदेशात यंदा खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही,...
नाफेड हरभऱ्याचा साठा विक्रीस काढणारकेंद्रीय अन्न मंत्रालयाने दि नॅशनल अॅग्रिकल्चरल...
दूध का दूध; पानी का पानीराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे...
शेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करण्याच्या...मी गूळ तयार करून पेठेत पाठवीत असे. प्रचलित...
दूध भुकटी निर्यात नऊ टक्के वाढण्याचा...महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी...
एकात्मिक शेती पद्धतीतून उत्पन्‍न दुप्पटनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...
पाऊसमानाकडे बाजाराचे लक्षमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला...
सोयाबीन वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वच पिकांत वाढ झाली...
शासनाच्या पाचशे योजना ‘डीबीटी’वर ः...नवी दिल्ली  ः शासानाने योजनांतील गैरव्यवहार...
कापसाच्या किमतीत वाढीचा कलया सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ...
विक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे...ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
नोंदी ठेवून करा शेतीचे नियोजनशेतीच्या नोंदी या अनुभव समृद्ध करण्यासाठी कामी...