हरभरा, साखरेच्या मागणीत वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

गेल्या सप्ताहात गहू वगळता सर्वच पिकांचे भाव उतरले. गव्हातही किरकोळ ०.५ टक्क्यांची वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, हरभरा व गवार बीचे भाव वाढतील. साखर व कापसाचे भाव अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने कमी होतील. गे ल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मिरची

मिरचीच्या (ऑक्टोबर २०१७) किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ८,२८४).   निर्यात मागणी वाढत आहे. किमतींत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

मका

खरीप मक्याच्या (ऑक्टोबर २०१७) किमती गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या पुन्हा १.४ टक्क्यांनी घसरून रु. १,४४९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४४३ वर आल्या आहेत.

डिसेंबरमधील फ्युचर्स किमती रु. १,४०६ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे.  किमती काहीशा घसरण्याचा संभव आहे.

साखर

साखरेच्या (ऑक्टोबर २०१७) किमती या सप्ताहात रु. ३,७०० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६८४ वर आल्या आहेत.

पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३५१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे.  किमतीत मर्यादित वाढ होण्याची शक्यता आहे.

हळद

हळदीच्या  किमती  या सप्ताहात  ३.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,४७८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,६४२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,५९८). पुढील किमती पर्जन्यमानावर अवलंबून आहेत.

सोयाबीन

सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात २४ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,०७१ ते रु. ३,२७७). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या सोयाबीन उत्पादन क्षेत्रातील पर्जन्यमान सुधारल्यामुळे ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,०९५ वर आल्या आहेत.

स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०८१ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,२०० आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. रु. ३,३०० - ३,३५० च्या आसपास जर भाव गेला तर हेजिंग करण्याचा विचार करावा.

गहू

ऑगस्ट महिन्यात गव्हाच्या (ऑक्टोबर २०१७) किमती घसरत होत्या (रु. १,६८८ ते  रु. १,६५५). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. १,६४० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७६७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.९  टक्क्यांनी कमी आहेत.    

गवार बी

गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमतीनी ऑगस्ट महिन्यात वाढ अनुभवली होती (रु. ३,५८२ ते ४,२३४). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून  रु. ३,७६२  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,७५० वर आहेत. 

सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८०६).  मागणी वाढत आहे. किमतींत वाढ अपेक्षित आहे.

हरभरा

हरभऱ्याच्या  किमती या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ६,०९४ वर आल्या आहेत.  स्पॉट (बिकानेर) किमती रु. ५,९१० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.६,०४०).

सध्या मागणी वाढती आहे; मात्र मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथे गेल्या सप्ताहात पाऊस पडल्याने पुढील काही दिवस किमतीत घसरण शक्य आहे.

कापूस

कापसाच्या  किमती  या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. १८,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,५४५ वर आलेल्या आहेत.

डिसेंबर २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १७,९६०). पुढील काही दिवस किमतींत घट संभवते. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गासडी).

डॉ. अरुण कुलकर्णी संपर्क ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com