agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

वायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा कल वाढीचा
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे भाव घसरले. मका व हरभरा यांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे भाव घसरले. मका व हरभरा यांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. यामुळे या पिकांच्या भावात तात्पुरती घट होईल. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. चीन या वर्षी आपल्याकडून सोयाबीन पेंड अधिक प्रमाणात आयात करेल, अशी अपेक्षा आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनांत या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती कमी होत आहेत.

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. १,३८७ ते रु. १,४९३). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. १,५७३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,६४१ वर आल्या आहेत. खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१८) किमतीसुद्धा ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. १,४६३ ते रु. १,५६०). खरीप मका (सांगली) चा डिसेंबर २०१८ डिलिवरी भाव १.९ टक्क्यांनी वाढून रु. १,६५९ वर आला आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). हमीभावात व बाजारातील किमतीत फारसा फरक नाही. मागणी चांगली आहे. भाव वाढण्याची शक्यता आहे.

साखर
साखरेच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात १९ तारखेपर्यंत रु. ३०९२ पर्यंत घसरल्या. त्यानंतर काही दिवस त्या वाढत होत्या; पण नोव्हेंबर महिन्यात त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,०१४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,००० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण, एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२३३ ते रु. ३,३७८). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,३६६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४१४ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,४०६, ३,४४८, ३,४९० व ३,५३२ भाव होते. लांबवरचा कल वाढीचा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८)च्या किमती ऑक्टोबर महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ६,८३६ ते रु. ६,४९६). या सप्ताहात त्या रु. ६,४१२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०६४ वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ९.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,४०८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पण, सध्या साठा पुरेसा आहे.

गहू
गव्हाच्या (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. २,०७९ ते रु. २,०४०). या महिन्यात त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या रु. २,०८८ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०८६ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१६६). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,३११ ते रु. ४,८४४). या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,३१२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१९ मधील फ्युचर्स किमती २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४११). खनिज तेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,२४६ ते रु. ३,९८१). या महिन्यात मात्र त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,६५२ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,६९६ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ४,५२५ वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६२७). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१८) किमती ऑक्टोबर महिन्यात २२ ऑक्टोबरपर्यंत वाढत होत्या (रु. २२,०८० ते रु. २२,९८०). नंतर त्या काहीश्या घसरल्या. या सप्ताहात त्या वाढत्या आवकेमुळे घसरून रु. २१,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,३०० वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,०५० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल, असा अंदाज आहे. पुढील वर्षी चीन भारतावर अधिक अवलंबून असेल, अशी अपेक्षा आहे. लांबवरचा कल वाढता आहे.

arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...