agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापूस, हरभऱ्याची मागणी वाढती
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हरभरा यांचे भाव उतरले. इतर शेतमालाचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हरभरा यांचे भाव उतरले. इतर शेतमालाचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील निवडणुका संपल्यावर तिचा जोर वाढेल, अशी अपेक्षा आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सप्ताहात अमेरिकेचे व चीनचे अध्यक्ष यांच्यात ९० दिवसांसाठी तह झाला. या कालावधीत ही दोन्ही राष्ट्रे आयातीवर अधिक कर लादणार नाहीत, असे ठरले आहे. चीननेही अमेरिकेकडून या ३ महिन्यांत आयात करण्याचे कबूल केले आहे. यामुळे सोयाबीन व इतर वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय किमतींत वाढ होण्याची शक्यता आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनात या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या.
१ डिसेंबरपासून एप्रिल २०१९ डिलिवरीसाठी रबी मका, खरीप मका, गहू व गवार बी यांचे, मे डिलिवरीसाठी कापूस, सोयाबीन व हरभरा यांचे आणि जुलै डिलिवरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
नवीन रब्बी मक्यासाठी (एप्रिल २०१९) १ नोव्हेंबरपासून व्यवहार चालू झाले आहे. खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १,६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यात बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७१५ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). हमी भावात व बाजारातील किमतीत फारसा फरक नाही. मागणी चांगली आहे.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३,१६१ ते रु. ३,०१०). या सप्ताहात त्या रु. ३,००० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९९० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण, एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,५१५ ते रु. ३,३७७). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,३६२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४२३ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे.(गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ४ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३६२, ३,४१०, ३,४६५ व ३,५२० भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६,४४८ व रु. ६,७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,४२८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०६९ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७८६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पण, सध्या साठा पुरेसा आहे.

गहू
गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २,०६४ ते रु. २,१४०). या सप्ताहात त्या रु. २,११३ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०९३ वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१४). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६९७ ते रु. ४,३५४). या सप्ताहात त्या रु. ४,४५१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५४६). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०७७ ते रु. ४,७०४). या सप्ताहात त्या रु. ४,६३३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६९०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या रु. २२,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,२९५ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,५५० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक उशिरा होईल, असा अंदाज आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...
वायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे...
वाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार...
साखरेचा कल घसरताया सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद, साखर व गवार बी...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...