agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाचा लांबवरचा कल वाढता
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस वगळता सर्व वस्तूंचे भाव उतरले. मक्याचे भाव स्थिर राहिले. मुख्यतः आवक वाढल्याचा हा परिणाम होता. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस वगळता सर्व वस्तूंचे भाव उतरले. मक्याचे भाव स्थिर राहिले. मुख्यतः आवक वाढल्याचा हा परिणाम होता. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

सध्या खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे, हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हरभ-याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. जागतिक पातळीवर गहू, तांदूळ व कापूस यांच्या उत्पादनांत या वर्षी घट संभवते. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या.
गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १,६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यांत बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७२१ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). हमीभावात व बाजारातील किमतीत फारसा फरक नाही. मागणी चांगली आहे.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३,१६१ ते रु. ३,०१०). या सप्ताहात त्या रु. २,९९० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९८४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. पण, एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,५१५ ते रु. ३,३७७). या सप्ताहातसुद्धा त्या ०.६ टक्क्यांनी कमी होऊन रु. ३,३४३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४०९ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३४३, ३,३८३, ३,४४०, ३,४९७ व ३,६५२ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६,४४८ व रु. ६,७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,५६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०१५ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७८६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. पण, सध्या साठा पुरेसा आहे.

गहू
गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २,०६४ ते रु. २,१४०). या सप्ताहात त्या रु. २,१०० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०८९ वर आल्या आहेत. मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२१५). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,६९७ ते रु. ४,३५४). या सप्ताहात त्या रु. ४,४०८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०० वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५१०). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०७७ ते रु. ४,७०४). या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,६२१). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपु-या पावसामुळे हरभ-याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या.(रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. २२,४६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,६२५ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,९२० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...