agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व गवार बी यांचे भाव उतरले. मक्याचे व साखरेचे भाव स्थिर राहिले. हळदीचे भाव वाढले. गव्हातील वाढ हंगामी स्वरूपाची आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व गवार बी यांचे भाव उतरले. मक्याचे व साखरेचे भाव स्थिर राहिले. हळदीचे भाव वाढले. गव्हातील वाढ हंगामी स्वरूपाची आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत खरीप मका व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

सध्या खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. हरभऱ्याची निर्यात व स्थानिक मागणी वाढत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे, त्याचाही भाव वाढण्यावर परिणाम होईल. खनिज तेलाच्या किमतींत आता घट होतेय, त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. तोच कल या सप्ताहात दिसत आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका
खरीप मक्याच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात रु. १६०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्यांत बदल झाला नाही. स्पॉट किमती (सांगली) ६ टक्क्यांनी वाढून रु. १८२८ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा आहे.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती नोव्हेंबरमध्ये घसरत होत्या (रु. ३१६१ ते रु. ३०१०). या सप्ताहात त्या रु. २९९५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २९९३ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत; पण एकूण कल घसरणीचा आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३५१५ ते रु. ३३७७). या सप्ताहात त्या रु. ३३६२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३४३० वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले, तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. ११ डिसेंबर रोजी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३३६२, ३४०३, ३४४०, ३४७० व ३५०४ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९)च्या किमती नोव्हेंबर महिन्यात रु. ६४४८ व रु. ६७८६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या महिन्यात त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ६७७६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७०४८ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६८०८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे.

गहू
गव्हाच्या (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. २०६४ ते रु. २१४०). या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. २१२१ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २२१५). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४६९७ ते रु. ४३५४). या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४२६७ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४२८३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४३७९). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. (रु. ४०७७ ते रु. ४७०४). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ४४९३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४४१५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४६२१). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१९) किमती नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,९३० ते रु. २१,७१०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,३५२ वर आल्या आहेत. मार्च २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,३०० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखालील लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठ).

arun.cqr@gmail.com 

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...