सोयाबीन, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कल

शेतीमालाचा वायदे बाजार
शेतीमालाचा वायदे बाजार

सोयाबीन, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कल या सप्ताहात गवार बी वगळता सर्वच पिकांचे भाव उतरले. गवार बीमध्ये दाेन टक्क्यांची वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, हरभरा व गवार बीचे भाव वाढतील. साखर व कापसाचे भाव अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने कमी होतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मिरची

मिरचीच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ७,८७२ पासून रु. ८,२६८ पर्यंत वाढल्या. या सप्ताहात त्या रु. ८,१७८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) रु. ८,१५४  वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ८,२७४). निर्यात मागणी वाढत आहे. किमतींत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

मका

खरीप मक्याच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. (रु. १,६०३ ते   रु. १,५५६). याही महिन्यात त्या घसरत आहेत. गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या पुन्हा २.९ टक्क्यांनी घसरून रु. १,४०७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४०३ वर आल्या आहेत.

डिसेंबरमधील फ्युचर्स किमती रु. १,४२३ वर आल्या आहेत. हमी भाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष  टन). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती काहीशा घसरण्याचा संभव आहे.

साखर

साखरेच्या (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,५२३ ते रु. ३,७०८). या सप्ताहात त्या रु. ३,७०० वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६५० वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३५१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे.  सणामुळे मागणी वाढती आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३०६.७ दशलक्ष टन).

सोयाबीन

सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात २४ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,०७१ ते रु. ३,२७७). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या सोयाबीन उत्पादन क्षेत्रातील पर्जन्यमान सुधारल्यामुळे २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,०२९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०४० वर आल्या आहेत.

जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,१७८ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १३.८ दशलक्ष  टन). खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती काहीशा घसरण्याचा संभव आहे.

हळद

हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,८९० ते ७,३४४). या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी घसरून रु. ७,२५० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४३६ वर  आल्या आहेत.

डिसेंबर २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,९२८). तेलंगण व कर्नाटक मध्ये पावसाची तूट गेल्या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे.

गहू

ऑगस्ट महिन्यात गव्हाच्या (ऑक्टोबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८८ ते  रु. १,६५५).  या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. १,६२७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,७६६ वर आल्या आहेत.

डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५  टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,६६९). मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.  

हरभरा

हरभऱ्याचे व्यवहार १४ जुलै रोजी एनसीडीईएक्समध्ये सुरू झाले. ऑगस्ट महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती वाढत होत्या (रु. ४,८८९ ते ६,३१९). या महिन्यात त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या ५.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,७३४ वर आल्या आहेत.

स्पॉट (बिकानेर) किमती रु. ५,६५४ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु.५,७४६). सध्या मागणी वाढती आहे; मात्र मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश येथे गेल्या सप्ताहात पाऊस पडल्याने पुढील काही दिवस किमतीत घसरण शक्य आहे.

कापूस

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १८,१८० व रु. १८,८९० या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. १८,५३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,८८४ वर आलेल्या आहेत.

डिसेंबर  २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,२००). २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).

गवार बी

गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१७) किमतीने ऑगस्ट महिन्यात वाढ अनुभवली होती (रु. ३,५८२ ते ४,२३४). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून  रु. ३,८३७  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,८७५ वर आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्युचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,९३०). राजस्थानमध्ये पाऊस समाधानकारक आहे. मागणी वाढत आहे.

संपर्क ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com