मका, साखर, हळदीच्या भावात घसरण

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.   सध्या खरीप पिकाची आवक सुरू झालेली आहे. गेल्या महिन्यात साखर, गवार बी, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. खनिज तेलाच्या किमतीत घट होत होती. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. या महिन्यात ही मंदी थांबेल अशी अपेक्षा आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी आशा आहे. हरभऱ्याची आवक सुरू होत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७७७ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती डिसेंबरमध्ये प्रथम घसरत होत्या; त्यानंतर त्या वाढून महिनाअखेर रु. ३०२७ वर आल्या आहेत. सध्या रु. ३,०२९ वर भाव स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९८७ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीनच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३,३७२ व रु. ३,४४४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,५८७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५३६ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). निर्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या अधिक राहण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी रोजी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,५८७, ३,६३३, ३,६७४, ३,७०१ व ३,७२८ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ६,५५६ व रु. ६,९१४ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,६०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९३३ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,६६०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. गहू गव्हाच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २४ डिसेंबरनंतर रु. २,१६४ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. २,०९३ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२५४). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४९९ ते रु. ४,२२६). गेल्या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३६६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या परत घसरून रु. ४,२६१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३६२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ०.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९१). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,७०४ ते रु. ४,४६५). या सप्ताहात त्या ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,३०९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मे २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४००). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,७१० ते रु. २१,११०). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,८६१ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,६८० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी). arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com