Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

मका, साखर, हळदीच्या भावात घसरण
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.
 

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.
 
सध्या खरीप पिकाची आवक सुरू झालेली आहे. गेल्या महिन्यात साखर, गवार बी, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. खनिज तेलाच्या किमतीत घट होत होती. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. या महिन्यात ही मंदी थांबेल अशी अपेक्षा आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी आशा आहे. हरभऱ्याची आवक सुरू होत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका
खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,७७७ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा आहे.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती डिसेंबरमध्ये प्रथम घसरत होत्या; त्यानंतर त्या वाढून महिनाअखेर रु. ३०२७ वर आल्या आहेत. सध्या रु. ३,०२९ वर भाव स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९८७ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीनच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३,३७२ व रु. ३,४४४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,५८७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५३६ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). निर्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे या महिन्यात किमती हमीभावाच्या अधिक राहण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी रोजी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,५८७, ३,६३३, ३,६७४, ३,७०१ व ३,७२८ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ६,५५६ व रु. ६,९१४ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,६०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९३३ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,६६०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे.

गहू
गव्हाच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २४ डिसेंबरनंतर रु. २,१६४ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून रु. २,०९३ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ८.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२५४). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४९९ ते रु. ४,२२६). गेल्या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३६६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या परत घसरून रु. ४,२६१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३६२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ०.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९१). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,७०४ ते रु. ४,४६५). या सप्ताहात त्या ४.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,३०९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मे २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४००). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,७१० ते रु. २१,११०). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. २१,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,८६१ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,६८० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com 

इतर अॅग्रोमनी
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...
हळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...
ग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...
युरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...
मका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...
कापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
देशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...
द्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...