Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाच्या किमतीत आणखी सुधारणा
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 22 मार्च 2019

निवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत.
 

निवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत.
 
हळदीची मागणी अजून मर्यादित आहे. उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. चीन सध्या आपल्या देशातून आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्‍बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्‍बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. १,४६२ ते रु. १,५५०)
या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. १,७४२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०९२ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्‍बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या (रु. ३,००५ ते रु. ३,११९). सध्या त्या रु. ३,११९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९१४ ते रु. ३,६६१). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७६१ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,७३४, ३,७८१, ३,७७८, ३,८७८, ३,८९७ व ३,६६७ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,३९८ ते रु. ६,१४८). गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,२६२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या परत २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१८० वर घसरल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,३४८). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण साठा कमी झाला आहे व निर्यात मागणी स्थिर आहे.

गहू
गव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २,०८७ ते रु. १,८०८). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. १,८९४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००६ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,९१९). रब्‍बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावाच्या जवळ असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४२१ ते रु. ४,१८४). गेल्या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १४ फेब्रुवारीनंतर घसरत होत्या. (रु. ४,३२९ ते रु. ४,११४). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,२३४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४७ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३०३). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्‍बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्या नंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,३१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. २१,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,२२२ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,०४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी वाढत आहे.
(सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com 

इतर अॅग्रोमनी
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...