मका, कापसामध्ये वाढीचा कल

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

गेल्या सप्ताहात गहू वगळता सर्वच वस्तूंचे भाव उतरले. गव्हाच्या भावातसुद्धा फक्त ०.३ टक्क्यांची वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यात मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखर व कापसाचे भाव अधिक आवकेच्या अपेक्षेने कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.

या सप्ताहात शासनाने रब्बी पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. हरभऱ्यासाठी गेल्या वर्षातील हमीभावापेक्षा ते ४०० रुपयांनी अधिक तर गव्हासाठी १०० रुपयांनी अधिक आहेत. एक नोव्हेंबरपासून एनसीडीईएक्सने फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी साखरेचे, मार्च डिलिव्हरीसाठी गवार बी, खरीप मका व गहू यांचे, एप्रिल डिलिव्हरीसाठी हरभरा, सोयाबीन यांचे आणि जून डिलिव्हरीसाठी हळदीचे व्यवहार सुरू केले आहेत. एमसीएक्सने एप्रिल डिलिव्हरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू केले आहेत. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका खरीप मक्याच्या (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. १,५५४ ते   रु. १,३७४). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १,३७१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३६६ वर आल्या आहेत. जानेवारी मधील फ्युचर्स किमती रु. १,३८५ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष  टन). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,४२५ ते रु. ३,३५१). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६२२ वर आल्या आहेत.  पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३१० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. या महिन्यात नवीन हंगामाचे उत्पादन सुरू होईल. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती २२ सप्टेंबरपासून घसरू लागल्या आहेत. (रु. ३,१५६ ते रु. ३,०३३). या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी घसरून रु. २,७७३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,७२९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २,९४६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १३.८ दशलक्ष  टन). गेल्या वर्षीचा साठा अजून शिल्लक आहे. गहू सप्टेंबर महिन्यात गव्हाच्या (नोव्हेंबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८२ ते  रु. १,६४३). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. १,७३६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,८६१ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,७९७). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,६८२  ते रु. ३,९४८ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,५४४  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,६३० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतीपेक्षा जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८१२). हरभरा सप्टेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती प्रथम वाढत होत्या (रु. ५,८४३ ते ६,१०५). १५ सप्टेंबरनंतर त्या घसरू लागल्या व महिना अखेर त्या रु. ५,६१३ पर्यंत आल्या. या सप्ताहात त्या ३.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,९३३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,८७१ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा २.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,७५८). कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा घसरत होत्या (रु. १९,०७० ते रु. १८,०३०). २१ सप्टेंबर नंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात त्या १.८  टक्क्यांनी घसरून रु. १८,१७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,२७९ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,४१०).  २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). हळद हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ७,८०८ ते ७,३६६). या सप्ताहात त्या अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने ५.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,०७० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,२५८ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने ०.८ टक्क्यांनी कमी आहेत  (रु. ७,१९८). 

arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com