सोयाबीन, हरभऱ्याच्या भावात घसरण

शेतीमालाचा वायदे बाजार
शेतीमालाचा वायदे बाजार

गेल्या सप्ताहात हळद, गहू व हरभरा यांचे भाव उतरले. सोयाबीन व गवार बी यांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळीतामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. १,३८१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३७१ वर आल्या आहेत. फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती रु. १,३९६ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष  टन). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या रु. ३,३१० वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६०७ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३१० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. या महिन्यात नवीन हंगामाचे उत्पादन सुरू होईल. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३०६.७ दशलक्ष टन). सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी वाढून रु. २,८५८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,७६८ वर आल्या आहेत. मार्च २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,०२२ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. आयातीवरील कर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमती हमी भावाच्या आसपास राहतील. हळद हळदीच्या किमती या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,९६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३६६ वर आल्या आहेत. मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.६ टक्क्यांनी कमी आहेत  (रु. ७,३२४). तेलंगण व कर्नाटकमध्ये पावसाची तूट गेल्या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. निर्यात्त मागणी कमी होत आहे. पुढील काही दिवसात किमती घसरण्याचा संभव आहे. गहू गव्हाच्या किमती या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. १,७५२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,८२९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.६ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,८००). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. कापूस कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या रु. १८,१७० वर स्थिर आहेत. स्पॉट (राजकोट) किमती  रु. १८,१९० वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १८,५१०). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यातील आवकेमुळे किमती मर्यादित घसरण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहातसुद्धा त्यांनी हा कल राखला व ३ टक्क्यांनी घसरून  रु. ४,६५९ वर त्या आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,७६३ वर आल्या आहेत.  मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,२६१). रब्बी पिकाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. एप्रिल मध्येसुद्धा किमतींत उतरण होण्याची अपेक्षा आहे (एप्रिल डिलिवरी चा सध्याचा भाव रु. रु. ४,२९६ आहे). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९५०  ते रु. ३,६१३). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७१ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,७१६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८२६). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे.

arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com