रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू, हरभऱ्याचे भाव उतरतील

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

गेल्या सप्ताहात मका, सोयाबीन, हळद व गहू यांचे भाव उतरले, इतरांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या  ०.८ टक्क्यांनी घसरून  रु. १,३७० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३६१ वर आल्या आहेत.  फेब्रुवारी  मधील फ्युचर्स किमती  रु. १,३८५ वर आल्या आहेत. हमी भाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष  टन).

मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमी भावाच्या आसपास राहण्याचा संभव आहे. साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या रु. ३,३१० वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,५८३ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३१० वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे.

या महिन्यात नवीन हंगामाचे उत्पादन सुरू होईल. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३०६.७ दशलक्ष  टन). सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. २,८४९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,७६९ वर आल्या आहेत. मार्च २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २,९९४ वर आल्या आहेत.  हमी भाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता.

या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १३.८ दशलक्ष  टन). गेल्या वर्षीचा साठा अजून शिल्लक आहे.   हळद हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात सतत घसरत होत्या (रु. ७,४०९ ते ७,०५६).  या सप्ताहातसुद्धा त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ६,९३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३६१ वर  आल्या आहेत.

मे २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी कमी आहेत  (रु. ७,१९०). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. नि गहू      ऑक्टोबर महिन्यात गव्हाच्या (डिसेंबर २०१७) किमती वाढत होत्या. (रु. १,६५६ ते  रु. १,७५६).   या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. १,७२१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,८३९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.३ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,८००). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,६९८  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,७४७ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८६२). आवक वाढती आहे. कापूस एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या रु. १८,२९० वर आल्या आहेत.  स्पॉट (राजकोट) किमती  रु. १८,०८९ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १८,५१०). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे.

लांबवरचा कल वाढता आहे. मात्र, खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती मर्यादित प्रमाणात घसरण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी). हरभरा ऑक्टोबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती सतत घसरत होत्या (रु. ५,४१७ ते ४,७०६).  या सप्ताहात मात्र त्या ५.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,९११ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,८८५ वर आल्या आहेत. उत्पादन वाढीच्या अपेक्षेने मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती पेक्षा १३.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,२९१).  एप्रिल डिलिवरीचा सध्याचा भाव रु. रु. ४,३३३ आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे.

arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com